शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात २० लाखांचा ३२० मेट्रिक टन फॉस्फोजिप्सम पावडर खताचा अवैध साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:54 IST

कृषी विभागाची कारवाई; चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना : उत्पादनाची परवानगी नसलेल्या फॉस्फोजिप्सम पावडर खताचा विनापरवाना असलेला तब्बल ३२० मेट्रिक टन साठा कृषी विभागाच्या पथकाने रविवारी जप्त केला. या प्रकरणात मंगळवारी रात्री चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना येथील रेल्वे रेक पॉइंटवर खताचा साठा उतरविला जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा परिषद कृषी विभागाचे खत निरीक्षक विशाल धर्मराज गायकवाड व त्यांचे सहकारी पॉइंटवर गेले. तेथे पाहणी केली असता कृष्णा पोस्केम लि. मेघानगर, जि. जाबुआ (मध्य प्रदेश) या कंपनीचा खतसाठा उतरविला जात असल्याचे दिसून आले. त्यातील फॉस्फोजिप्सम पावडर खताच्या साठ्याची पाहणी केली असता, कंपनीला त्या खताचे उत्पादन करण्याची परवानगीच नसल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता तो खताचा साठा गुंडेवाडी शिवारातील भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामात साठविला जात असल्याची माहिती मिळाली. 

तेथील पंचनाम्यानंतर पथकाने गोदामाची पाहणी केली असता आतमध्ये २० लाख रुपये किमतीचा तब्बल ३२० टन खताचा साठा दिसून आला. पथकाने हा साठा जप्त केला असून, या प्रकरणात खत निरीक्षक विशाल गायकवाड यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंपनीसह परवान्यातील जबाबदार व्यक्ती इंद्रराजसिंग डांगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी गुण नियंत्रण आशिष काळुशे, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी नीलेश कुमार भदाणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी विशाल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

नमुने प्रयोगशाळेतकारवाईवेळी कृषी विभागाच्या पथकाने खताचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी