शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक; पाच जणांविरूध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:17 IST

वैध वाळू वाहतूक प्रकरणात पाच जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक कारवाई डोंगरगाव- देवपिंपळगाव शिवारात रविवारी सायंकाळी तर दुसरी कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास रांजणगाव झोपडपट्टी मार्गावर करण्यात आली.

बदनापूर : अवैध वाळू वाहतूक प्रकरणात पाच जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक कारवाई डोंगरगाव- देवपिंपळगाव शिवारात रविवारी सायंकाळी तर दुसरी कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास रांजणगाव झोपडपट्टी मार्गावर करण्यात आली.डोंगरगाव- देवपिंपळगाव दरम्यान केलेल्या कारवाईत एका वाहनासह पाच ब्रास वाळू असा ३० लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात सपोनि शाहुराज भिमाळे यांच्या तक्रारीवरून राजू धळाजी वनारसे (रा. विटा ता.भोकरदन), कृष्णा शालिकाराम घनघाव, कृष्णा प्रकाशराव घनघाव (दोघे रा.डोंगरगाव ता. बदनापूर) या दोघाविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ डोईफोडे हे करीत आहेत.सोमवारी रांजणगाव झोपडपट्टी भागात एका वाहनावर कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनासह एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोहेकॉ धनसिंग गब्बरसिंग जारवाल यांच्या तक्रारीवरून शेख इसाक शेख मुसा (रा. रांजणगाव ता. बदनापूर), सर्जेराव खांडेकर (रा.काजळा, ता. बदनापूर) या दोघाविरूध्द बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ डोईफोडे हे करीत आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरूध्द पोलीस व महसूल पथकाने सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग