शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

व्यवसाय करायचा तर महिना पाच हजार रूपये दे; धमकावत हॉटेल मालकास चाकूने भोसकले

By विजय मुंडे  | Updated: December 19, 2023 19:50 IST

महिन्याला पाच हजार रूपये द्यावे लागतील अन्यथा तुझी हॉटेल चालू देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली.

राजूर (जि.जालना) : तुला हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला पाच हजार रूपये दे अन्यथा दुकान चालू देणार नाही अशी धमकी देत चौघांनी बॉटल व चाकुने भोसकून हॉटेल मालकास गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी सांयकाळी राजूर येथे घडली. याप्रकरणी चार जणाविरूध्द राजूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण फरार झाला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात सुध्दा भाईगिरीचे लोण पसरत असल्याची चर्चा होत आहे.

राजूर येथे जालना मार्गावरील पेट्रोल पंपाशेजारी दिनेश जैस्वाल यांचे खानावळीचे आनंद हॉटेल आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सागर साहेबराव पवार, बाळू सखाराम पुंगळे, ज्ञानेश्वर भास्कर पुंगळे, बादल भाऊसिंग सुर्यवंशी (सर्व रा.राजूर) हे चौघे हॉटेलमध्ये गेले. दिनेशचा भाऊ राजेंद्र याला तुला हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला पाच हजार रूपये द्यावे लागतील अन्यथा तुझी हॉटेल चालू देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. दिनेशने तुम्हाला पैसे कशाचे दयायचे मी देणार नाही, असे म्हणताच त्या चौघांनी दिनेशच्या डोक्यात थंडपेयाच्या बॉटल मारल्या. फायटरने मारहाण करून पोटात चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. हॉटेलातील खुर्च्या- टेबलांची तोडफोड केली.

या घटनेत दिनेश जैस्वाल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजेंद्र जैस्वाल याच्या फिर्यादीवरून वरिल चौघांविरूध्द भा.दं.वि. ३०७, २३४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर पवार, ज्ञानेश्वर पुंगळे, बादल सुर्यवंशी यांना अटक केली असून, बाळू पुंगळे याचा शोध सुरू आहे. तपास सपोनि. शिवाजी नागवे हे करीत आहेत.

 

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी