शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, ४ तारखेला गोदावरी नदी पात्रात उडी घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:55 IST

धनगर आंदोलक बळीराम खटके यांचा सरकारला इशारा!

पवन पवार,वडीगोद्री- येत्या ४ तारखे पर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, तर हा बळीराम खटके चार तारखेला संध्याकाळी चार वाजता गोदावरी नदी पात्रात उडी घेणार, असा इशारा बुधवारी वडीगोद्री येथील धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको दरम्यान धनगर आंदोलक बळीराम खटके यांनी सरकारला दिला आहे.

सरकारला मला आत टाकायचं टाकू द्या, माझ्यावर गुन्हा दाखल होऊ द्या. आमचा एक बांधव तिकडे उपोषणाला बसला आहे, तो स्वतःच्या जीवाची परवा करत नाही. जर सरकारला आंदोलनाची भाषा करत असेल तर सरकारला आंदोलनाने उत्तर देणार. जर सरकारला आमचा जीवच घ्यायचा असेल येणाऱ्या चार तारखेला चार वाजता धनगर समाजाचा एक बळी गेलेला तुम्हाला नक्की दिसेल. मंग जर तुमच्या आमदार खासदाराला काही झालं महाराष्ट्रात जर तांडव निर्माण झाला तर याला सरकार जबाबदार असेल. येणाऱ्या आठ दिवसात जर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर एकाही आमदार व मंत्र्यांना फिरू द्यायच नाही, असेही बळीराम खटके म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर शिष्टमंडळाची जी बैठक झाली, त्या बैठकीला काल मी पण होतो. पण त्या बैठकीत धनगर समाजाच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. आम्ही देवेंद्र फडवणीस यांना सांगितले की, २०१४ ला जो वादा केला होता, पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊ, अकरा वर्षात तुमचा धनगर आरक्षणाबाबत अभ्यास झाला नाही का ?  त्यामुळे या सरकारचा मला जाहीर निषेध करायचा आहे.

तुमच्या आमच्या मतावर निवडून यायचं, सत्ता भोगायची  नंतर धनगराच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम कोणी केले असेल तर या महायुती सरकारने केले आहे. ७० वर्षापासून धनगर समाज बांधवांनी हा एसटी आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे. आमचा हा लढा काय दोन-चार वर्षांपूर्वी चालू झालेला नाही. मला देवेंद्र फडणवस साहेबांना हे सांगायचे की ७० वर्षापासून चालू असलेला लढा असताना तुम्ही फक्त आश्वासन देता. आता हा धनगर समाज दूध खुळा राहिला नाही. आम्ही दोन्ही सरकार पाहिले महाविकास आघाडी पाहिलं आणि महायुती सरकारही पाहिलं, आमचं कोणीही नाही. धनगर शांत आहेत पण संत नाही.

माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, तुम्ही आम्हाला बापू वीरू विटेगावकर होऊ देऊ नका. वेळ आली तर आम्हाला हातात कुऱ्हाड घ्यावी लागेल. दीपक बोराडे यांच्या तब्येतीला काय झालं तर या महाराष्ट्रात तांडव माजल असा इशारा धनगर आंदोलक बळीराम खटके यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhangar Community Threatens Suicide Over Unfulfilled ST Reservation Promise.

Web Summary : Dhangar activist Baliram Khatke threatens self-immolation in Godavari River if the ST reservation promise isn't fulfilled by the 4th. He accuses the government of deception and warns of widespread unrest if their demands aren't met, criticizing delayed action.
टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालना