शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षणास चॅलेंज करू: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Updated: February 1, 2024 11:46 IST

मराठा समाजातील अभ्यासकांनी सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येवून म्हणणे मांडावे.

जालना : सग्यासोऱ्यांबाबत अध्यादेश निघाला असून, त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. मुंबईला गेल्यानंतर आम्हाला तो अध्यादेश मिळाला. मराठा समाजातील अभ्यासकांनी सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येवून म्हणणे मांडावे. तुमचे शब्द त्या कायद्यात घ्यायला, सरकारला सांगू, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षण चॅलेंज करावे लागणार आहे आणि आपण ते करू, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश निघाला असून, त्यावर हरकती मागितल्या आहेत. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे, यासाठी १० फेब्रुवारी रोजी उपोषण सुरू केले जाणार आहे. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्याने गॅझेट घेण्याबाबतची मागणी आहे. साडेतीन महिन्यांपासून सगेसोयऱ्यांबाबतची मागणी आहे. त्यावेळी तुम्हाला योग्य वाटत होते. आता ते मिळाले तर मुंबईला जावून हाती काय पडले अशी विचारणा सोशल मीडियावर केली जात आहे. गोरगरिबांच्या हाताला आरक्षणाच्या कायद्यासाठी लागणारा अध्यादेश लागला. परंतु, त्यांच्या हाताला काही नाही लागले. पद, पैसा नाही लागला. ते आम्ही मिळू देणार नाही. आयुष्यभर तुमचे दुकान बंद. आरक्षणाची नोंद न मिळालेल्यांना आरक्षण मिळणार आहे. आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षण चॅलेंज करावे लागणार आहे आणि आपण ते करू, असेही जरांगे पाटील म्हणाले.

तुम्ही फक्त चष्म्याच्या काचा बदलाओबीसींच्या घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केल्याच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, कोणाच्या घरासमोर केला. ओबीसींची घरे आमचे आहेत. ओबीसी आमच्यात गुलाल घेवून नाचतात. एकदा कायद्याची अंमलबजावणी होवून सग्यासोऱ्यांच्या मार्फत प्रमाणपत्र मिळाले ना तुम्ही महादिवाळी बघा अन् विजयाची महासभा बघा. तुम्हाला खूप बघायचे आहे. चष्म्याच्या काचा बदलीत रहा फक्त. काहीही केले तरी मराठा आरक्षणात जाणार आहे. त्यामुळे भुजबळ यांनी ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये वाद लावू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण