शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:24 IST

उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. जर पाणी मिळाले तर ते दूषित असण्याची शक्यता असते. तसेच उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला.गुरुवारी अध्यक्ष खोतकर यांनी जिल्ह्यातील पशुधनविकास अधिकारी, सहाय्यक पशुधन अधिकारी व पशुनधन पर्यवेक्षकांची बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जर पाणी मिळाले तर ते दूषित असते. तसेच उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने पशुधनविकास अधिकारी, सहायक पशुधन अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांनी कोणताही निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार व त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावेत. दुष्काळी परिस्थितीच्या काळात अधिका-यांनी दिवसभर दवाखान्यातच राहावे. अधिकारी दवाखान्यात उपलब्ध नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी खोतकर म्हणाले.दुष्काळी परिस्थिती जनावरांना पाणी, चाराटंचाई भासू नये, तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिका-यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. या काळात जर अधिका-यांनी कामात निष्काळजीपणा केल्यास त्या अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदHealthआरोग्य