शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवरा-बायकाेचा वाद मिटवायला आले अन् हाणामारी करून बसले; ११ जणांवर गुन्हा

By महेश गायकवाड  | Updated: March 25, 2023 15:08 IST

दोन्ही गटांत झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

मंठा: सून सासरी नांदत नसल्याने घरातील वाद मिटविण्यासाठी सासर आणि माहेरकडील नातेवाईक बैठकीसाठी आले; पण वाद मिटविण्याच्या नादात दोन्हीकडील नातेवाइकांत काठ्या आणि दगडांनी हाणामारी झाली. यात काहीजण गंभीर जखमी झाले. ही घटना मंठा शहरातील तळणी फाटा येथे २४ मार्च रोजी घडली. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची माहिती अशी की, मंठा तालुक्यातील शिरपूर येथील मनोहर शिरसाट यांचा जवळा येथील राजबिंडे कुटुंबातील मुलीशी विवाह झालेला आहे. लग्नानंतर बायको नांदत नसल्याने घरात वाद-विवाद वाढले होते. हा वाद आपापसात मिटविण्यासाठी २४ मार्च रोजी शिरसाट व राजबिंडे कुटुंबातील व्यक्तींची तळणी फाटा येथील मंगल कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत घटस्फोट घेऊन वाद मिटविण्याची चर्चा झाली. 

यावेळी विवाहितेकडील नातेवाइकांनी लग्नातील खर्च देऊन घटस्पोट द्या, अशी मागणी केली. यावर दोन्ही गटांत झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आणि वाद विकोपाला गेला. दोन्ही गटांत काठ्या, दगड व लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर मंठा पोलिस ठाण्यात दोन्हीकडील नातेवाइकांनी परस्परविरोधी तक्रार दिली. या तक्रारीवरून अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत व पोहेका चव्हाण हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना