शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कसे व्हावे आसवांचे व्यवस्थापन..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:39 IST

अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे. दरम्यान गुरुवारी जिल्हा प्रशासनाने जायकवाडी धरण भरल्यास गोदाकाठच्या ३८ गावांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा आढावा बैठकीत दिला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात गुरूवारी दुपारपर्यंत ६६.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या वरील क्षेत्रातून पाण्याची आवाक वाढली तर जायकवाडी प्रकल्प भरणार असून, त्यानंतर गोदावरी नदीपात्रातून जालना जिल्ह्यात पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी सोडले तर जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बळेगाव येथे पाणी पोहोचेल. तसेच अंबड मधील १७ गावे, घनसावंगी तालुक्यातील १७ व परतूर तालुक्यातील ५ अशा ३८ गावे नदीकाठी असून, पाण्याची आवक वाढली तर या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते.ही शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे व प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, स्थानिक संस्था, मित्रमंडळांनीही आपत्ती काळात मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.बैठकीत उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांनी जिल्ह्यात सद्यस्थित आवश्यक शोध व बचाव साहित्य असून प्रशासन धरणांच्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. तसेच कोणत्याही आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन यांनी केले. बैठकीस तहसीलदार मनीषा मेने, डॉ. संदीप ढाकणे, नायब तहसीलदार स्नेहा कुहीरे, कोटूरकर, शेडोळकर, बी.के.चंडोळ, डॉ.विलास रोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाईनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कामात कोणत्याही विभागाने हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हे अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.आपत्ती काळात सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, चुकीची माहिती, अफवा पसरवणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.पालकमंत्र्यांच्याही सूचनाजायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, प्रकल्प भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाय साथरोग पसरू नयेत यासाठी दक्षता घ्यावी, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाfloodपूर