शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

घोडे तो बहुत है बाजार मे...!; विधान परिषदेच्या मतदारांनी नाराज होऊ नये : दानवे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:45 IST

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदारांशी खास शैलीत संवाद

- संजय देशमुख  

जालना : औरंगाबाद- जालना स्थानिक विधान परिषदेची यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली आहे. युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी संयुत्त पत्रक काढून घोडेबाजार न करता प्रमाणिकपणे मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. या अनोख्या आवाहनाचे पडसाद रविवारी जालन्यातील बीज शीतल सिडस्च्या सभागृहात पार पडलेल्या युतीच्या बैठकीत उमटले. 

अनेक जि.प. सदस्य तसेच नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आम्ही प्रामाणिकपणे मतदान नेहमीच करतो, परंतु यंदा आम्हाला घोडे अर्थात खरेदीदार समजून आमचा अपमान झाल्याची भावना बोलून दाखवली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत थेट १९९८ च्या पंतप्रधान वाजपेयींचे सरकार ज्यावेळी एका मताने पडले होते. त्याची आठवण करून देत ‘घोडे तो बहुत है बाजार मे.. लेकीन खरेदीदार नही’ असे म्हटल्याचे सांगून हशा पिकवला.

जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेने जो राष्ट्रवादीसोबत  घरोबा केला आहे, त्यात देखील लवकरात लवकर शिवसेनेने काडीमोड घ्यावा असा सूचक इशाराही उपस्थित राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे कटाक्ष टाकत दिला. एकूणच आजची ही बैठक युतीचे उमेदवार अंबादास दानवेंना विजयी करण्यासाठीची व्युहरचना आखणारी ठरली. त्याच दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. आजच्या बैठकीत राज्यमंत्री खोतकरांनीही अंबादास दानवेंना विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या मतदारांना व्हीप पाळण्याचे आवाहन केले. या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. १९ रोजी निवडणूक होत आहे. त्याामुळे अंबादास दानवे आणि बाबूराव कुलकर्णींकडून मतदारांच्या वैय्यक्तीक भेटींवर भर देऊन संपर्क गतीमान केला आहे. 

जालना जिल्ह्यातील मतदारांची संख्या  या निवडणुकीत जालना जि.प. ६४, भोकरदन पालिका २०, जाफराबाद नगरपंचायत १९, जालना न.प. ६७, बदनापूर नगरपंचायत १९, मंठा नगरपंचायत १९, घनसावंगी नगरपंचायत १९, परतूर पालिका २३ आणि अंबड पालिका २२  असे २७२ मतदार जालना जिल्ह्यात आहेत. त्यात जालना, भोकरदन, घनसावंगी, परतूर या काँग्रेसकडे असून, उर्वरित युतीकडे आहेत.    

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपाShiv Senaशिवसेना