शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात ऑनर किलिंग; विवाहित प्रेमी युगुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 13:31 IST

मुद्दाम ट्रॅक्टर आमच्या अंगावर घातला जखमी अवस्थेत युवकाने आईला फोन करून सांगितले

ठळक मुद्देजालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घटना मृत महिलेच्या सासरा आणि दीरावर आरोप

जालना : विधवा सुनेच्या अनैतिक संबंधांना वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून व तिच्या प्रियकरास ट्रॅक्टरखाली चिरडून मारून टाकले. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी चापडगावच्या (ता.अंबड जि. जालना) शिवारात घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.भागवत प्रल्हाद हरबक (२७), मारिया विनोद लालझरे (३२) अशी मृतांची नावे आहेत. मारियाच्या पतीने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली आहे. भागवत लाल बावटा संघटनेचा चापडगावचा अध्यक्ष होता.

बुधवारी संघटनेचा कुंंभार पिंपळगाव येथे मेळावा होता. त्यामुळे भागवतने काही जणांना घेऊन जाण्यासाठी दोन जीप व एक मालवाहतूक वाहन ठरविले होते. भागवतवर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्याने तो व मारिया हे दोघे दुचाकीवरून (क्र. एम.एच. २१- ए. के. १९७७) मेळाव्याला गेले. पण दीड तासाने भागवतच्या दुचाकीला अपघात झाल्याचे त्याच्या कुटुंबियांना समजले. कुटुंबियांनी गंभीर अवस्थेत भागवत व मारिया यांना जालना येथील रुग्णालयात नेले. रस्त्यात जखमी भागवतने आई सीताबाई यांना सांगितले की, ‘विकास बथवेल लालझरे याने मुद्दाम ट्रॅक्टर आमच्या अंगावर घातला.’ भागवत व मारियाचा रुणालयात नेतानाच मृत्यू झाला.

भागवत व मारिया यांच्यातील संबंधांचा राग येऊन मारियाचा सासरा बथवेल याच्या सांगण्यावरून मारियाचा दीर विकासने दोघांचा खून केल्याची तक्रार भागवतची पत्नी राधा यांनी अंबड ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, अंबडचे निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनानंतर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी भागवतच्या नातेवाईकांनी आरोपींविरुद्ध अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :Honor Killingऑनर किलिंगMurderखूनJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी