शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्याची क्रूरता! पळून गेल्याच्या रागातून लावला मुलीस गळफास अन् मृतदेहही जाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 11:53 IST

प्रेमप्रकरणातून मुलगी पळून गेल्याचा राग; वडिलांसह काका पोलिसांच्या ताब्यात

जालना : जन्मदात्या पित्याने भावासोबत मिळून अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेहही जाळला. ही धक्कादायक घटना पीरपिंपळगाव (ता. जालना) येथे घडली असून, या प्रकरणात मयत मुलीच्या वडिलांसह काकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगी नात्यातील मुलासोबत निघून गेल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सूर्यकला संतोष सरोदे (१७) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी संशयित संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे (दोघेही रा. पीरपिंपळगाव) यांना ताब्यात घेतले. सूर्यकला नात्यातील एका मुलासोबत निघून गेली होती. नातेवाईकांनी ‘तुमचे लग्न लावून देतो, तुम्ही घराकडे या,’ असे सांगून त्यांना बोलावून घेतले. दोन्ही परिवार मंगळवारी दुपारी पीरपिंपळगाव येथील एका मंदिरात लग्न लावण्यासाठी एकत्र आले. त्याचवेळी नामदेव सरोदे याने मुलीच्या नावावर अर्धा एकर शेतजमीन करून द्या, अशी मागणी केली. परंतु, मुलाच्या परिवाराने शेतजमीन नावावर करण्यास नकार दिला. संतोष सरोदे हे मुलीसह पुन्हा घरी आले.

या घटनेमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याची सल मनात निर्माण होऊन मुलीचे वडील व काकांनी तिला शेतातील कडूलिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावला व त्यानंतर तेथेच मुलीचा मृतदेह जाळूनही टाकला. या घटनेची माहिती बुधवारी सकाळी खबऱ्यामार्फत मिळाल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोउपनि. पोहार, पोउपनि. झलवार यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रारंभी वडील व काकाने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोहेकॉ. जितेंद्र तागवाले यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. झलवार करत आहेत.

पुन्हा जिल्हा हादरला : ११ महिन्यात ४४ खूनकाही दिवसांपूर्वीच शहरातील चौधरीनगर येथे १४ वर्षांच्या मुलीने ५ वर्षांच्या मुलीचा खून केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यातच आता वडिलांनीच मुलीचा प्रेमप्रकरणातून खून केला आहे. त्यामुळे जालना जिल्हा पुन्हा हादरला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत जवळपास ४४ खून झाले आहेत. वाढत्या खुनांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी