शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:52 IST

शुक्रवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/ भोकरदन : नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात जमियत ए उलमाच्या वतीने शुक्रवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक - २०१९ हे धर्माच्या आधारावर त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करणारे असून, या विधेयकामधून नागरिकांना धर्माच्या आधारावर विभाजित करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप जमियत उलमा ए हिंद या संघटनेने केला आहे. या विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी दुपारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘ए बील क्या कर पाये गा, आया है तो जाएगा’, ‘सीएबी जो आया है, नफरत साथ में लाया है’ यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन करीत केंद्र शासनाच्या या विधेयकाला विरोध दर्शविला. तसेच केंद्र शासनाने हे विधेयक रद्द केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अहेमद खान मोफ्ताई, इक्बाल पाशा, अब्दुल हाफिज, पाशा, मुफ्ती अब्दु र्रहमान, मुफ्ती सोहेल, हाफीज जुबेर, रईस अहमद मिल्ली, मुफ्ती फारूख, अ‍ॅड. अशपाक पठाण, मुफ्ती रमजान नदवी, मुफ्ती फहीम, मोहंमद हसन मोहल्ली, अहेमद बिन सईद आदींची उपस्थिती होती. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भोकरदन, मंठा येथेही मागण्यांचे निवेदन सादरभोकरदन येथेही उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या विधेयकाच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असून, विधेयक रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष हाफीज शेख शफीक, मौलाना हरून, उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी, नसीम पठाण, कदिर बापू, शफीकखा पठाण, शब्बीर कुरेशी, शेख नजीर, त्र्यंबक पाबळे, प्रा. अब्दुल कुद्दुस, श्रावणकुमार आक्से, गज्जू कुरेशी, आदींनी मनोगत व्यक्त केले.निवेदनावर तालुकाध्यक्ष मौलाना हाफिज शेख शफीक, मौलाना हारून देशमुख, मौलाना इम्रान नदवी, मौलाना शेख फेरोज, हाफिज जावेद, मुफ्ती खालिद, हाफिज अन्सार, मौलाना जमील, हाफिज अब्दुल माजिद, मौलाना इम्रान, मौलाना मुजीब, मौलाना अब्दुल रहेमान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना