शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हायवाची कारला धडक, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:39 IST

वाळूने भरलेल्या हायवाने मारोती गाडीला जोराची धडक दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद सोलापूर मार्गावर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : वाळूने भरलेल्या हायवाने मारोती गाडीला जोराची धडक दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद सोलापूर मार्गावर घडली. यात कारच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले.अंकुशनगर येथील गोदावरी पात्रातून वाळू भरुन औरंगाबाद कडे निघालेल्या विनाक्रमाक हायवाने बिडकडे जाणारी वॅगनर कार क्रमांक एम.एच. ०२ ए. एन. ८११७ या गाडीला समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर जोराची धडक दिली. यात बलभीम अण्णा वाघमारे (४६) संगीता बलभीम वाघमारे (४०) , महेश रमेश मोरे चालक (२५, सर्व राहणार हनुमाननगर, बीड) या घटनेत जखमी झाले. जोराच्या धडकेमुळे परिसरात मोठा आवाज झाला. धडक झाल्याने समजताच अंकुशनगर पोलीस चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने कारखान्याच्या खाजगी डॉक्टरकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मार्गावर हायवामुळे अपघात वाढले आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी हायवाच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला.चालकाने पळ काढलाऔरंगाबाद, सोलापूर महामार्गावर अपघात होतात. परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे चालकाने हायवा सोडून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून वॅगनर कार, आणि हायवा ताब्यात घेतला. विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या पथकाने काल परिसरात वाळूच्या साठ्याची पाहणी केली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी वाळूची वाहतूक सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातcarकार