शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेला जाताना धडकली वडिलांच्या मृत्यूची वार्ता; काळजावर दगड ठेवून मुलीने दिला पेपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 17:41 IST

एकीकडे वडिलांचा मृत्यू अन् दुसरीकडे बारावीची परीक्षा; पेपर दिल्यानंतर मुलीने घेतले अंत्यदर्शन

- गणेश पंडितकेदारखेडा (जि.जालना) : बारावी बोर्ड परीक्षेचा पेपर देण्यासाठी निघालेल्या भोकरदन तालुक्यातील कोदुली येथील कोमलला आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची वार्ता कानावर आली. आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. एकीकडे बारावीचा पेपर अन् दुसरीकडे आपला बापाच्या मरणाचे दु:ख. अशा स्थितीत कोमलने काळजावर दगड ठेवून गुरुवारी मराठीचा पेपर दिला. पेपर दिल्यानंतर तिने आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन घेतले. ही घटना परीक्षा केंद्रातील शिक्षकांना कळल्यावर तेदेखील भावुक झाले होते.

भोकरदन तालुक्यातील कोदुली कोमल शिंदे हिचे वडील संजय गंगाधर शिंदे हे ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारात किराणा साहित्याची विक्री करतात. मंगळवारी आठवडी बाजार आटोपून ते बरंजळा-कोदुली मार्गावरून दुचाकीने आपल्या गावाकडे येत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. आमदार संतोष दानवे, माजी. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत साबळे, भगवान गिरणारे यांनी त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न केले. परंतु, शेवटी प्रयत्न व्यर्थ ठरले आणि त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. 

मयत संजय शिंदे यांची मुलगी कोमल सध्या बारावीची परीक्षा देत आहे. गुरुवारी तिचा मराठी विषयाचा पेपर होता. पेपर देण्यासाठी निघालेली असताना तिला वडिलांच्या निधनाची बातमी कळाली. शेवटी जडअंत:करणाने कोमलने बाभूळगाव येथील नागेश्वर बाबा उच्च विद्यालयात पेपर दिला. परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राचे प्रा. विकास वाघ यांना ही बातमी कळाली. त्यांनी कोमलची भेट घेऊन तिला धीर दिला. पेपर देऊन घरी आल्यानंतर तिने आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन घेतले. यावेळी अंत्यदर्शनासाठी आलेल्या नातेवाइकांनी हे दृश्य पाहून हंबरडा फोडला होता.

टॅग्स :examपरीक्षाJalanaजालनाEducationशिक्षण