शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

इथं मोडीत निघतात जाती-धर्माच्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:12 IST

जाती-धर्माच्या भिंतींना छेद देत गणेशोत्सवासह सर्व सण, उत्सव एकत्रितरीत्या साजरे करण्याची परंपरा जलना शहरासह जिल्ह्याने कायम जपली आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जाती-धर्माच्या भिंतींना छेद देत गणेशोत्सवासह सर्व सण, उत्सव एकत्रितरीत्या साजरे करण्याची परंपरा जलना शहरासह जिल्ह्याने कायम जपली आहे. या परंपरेला अधिक घट्ट केलं ते गुलाब खाँ पठाण या मूर्तीकाराने! गणेशोत्सवातील श्रींच्या मूर्ती तयार करण्यासाठी पठाण यांचे अख्खे कुटुंब सलग चार महिने परिश्रम घेते. त्यांनी तयार केलेल्या गणरायांच्या मूर्तींना जिल्ह्यासह बुलडाणा, औरंगाबाद जिल्ह्यातही मागणी आहे.शहरी, ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळ, भाविकांकडून गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. त्याच प्रमाणे जालना शहरातील राजीव गांधी नगर मधील लालबाग परिसरातील मूर्तीकार गुलाब खाँ राजदार खाँ पठाण व त्यांचे कुटुंबिय मागील चार महिन्यांपासून गणरायाच्या मूर्ती तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहे. इयत्ता ४ थी च्या वर्गात शिक्षण घेत असताना गुलाब पठाण यांचा मित्र गणेश लांडगे हा विविध प्रकारच्या मूर्ती तयार करीत होता. लांडगे यांच्या घरी जाणे-येणं असल्याने गुलाब पठाण यांनाही मूर्ती तयार करण्याची आवड निर्माण झाली. वाढत्या वयाबरोबर त्यांनी मूर्ती तयार करण्याची कला जोपासली.मजुरांच्या हाताला कामगुलाब खाँ पठाण यांचे अख्खे कुटुंब गणेश मूर्ती तयार करण्यासाठी काम करते. या व्यवसायात इतर मजुरांच्या हाताला चार महिने काम मिळते. या व्यवसायातून पठाण यांच्यासह मजुरांच्या कुटुंबालाही आधार मिळाला आहे. येथील श्रींच्या मूर्ती खरेदीसाठी शहरासह परिसरातील भाविक गर्दी करतात.व्यवसायाला महागाईचा फटकादुष्काळ आणि वाढत्या महागाईची झळ पठाण यांच्यासह इतर मूर्तीकारांच्या व्यवसायाला बसली आहे. त्यामुळे यंदा गणरायांच्या मूर्तींचे दर २० टक्क्यांनी वाढणार असल्याचे ते पठाण सांगतात.गणरायाच्या आकर्षक मूर्तीगुलाबखाँ पठाण यांनी लालबागचा राजा, हत्ती सिंहासन असलेले गणराया, शंकराच्या रूपातील गणराया, राम मंदिरातील गणराया, बाल गणेश, शंकराच्या रूपातील गणराया, कृष्णाच्या रूपातील गणराया आदी विविध आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवbusinessव्यवसायSocialसामाजिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम