शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! एक दिवसाच्या बाळाला काटेरी झुडपात टाकून माता गायब

By विजय मुंडे  | Updated: April 1, 2023 19:17 IST

जखमी बाळावर महिला रुग्णालयात उपचार; अज्ञात व्यक्तीसह मातेचा शोध सुरू

अंबड : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील काटेरी झुडपात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक शनिवारी सकाळी आढळून आले. जखमी अवस्थेतील त्या बालकावर जालना येथील महिला रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध अंबड ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मातेसह इतर व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत.

अंबड शहरातील हॉटेलचालक मारोती देवराव शिंदे हे शनिवारी सकाळी अंबड उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ गेले होते. त्यावेळी काटेरी झुडपात दगडांच्या आतमध्ये एक नवजात पुरुष जातीचे अर्भक त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ अंशिराम बापूराव लांडे, शहादेव शंकरराव कांबळे यांना सोबत घेऊन बालकाला उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे चौकशी केल्यानंतर त्या बालकाची नोंद उपजिल्हा रुग्णालयात नसल्याचे समोर आले. त्यावेळी अधीक्षक डॉ. डी.एन. देगावकर, डॉ. मंगल पवार यांनी बालकावर प्रथमोपचार करून पोलिसांना माहिती दिली. प्रथमोपचारानंतर त्या बालकास बाल कल्याण समिती अध्यक्ष एकनाथ राऊत, बालकल्याण समिती सदस्य ॲड. कैलास जारे, योगिता मांटे, हेल्पलाईनचे केंद्र समन्वयक संतोष दाभाडे, स्वयंसेवक सचिन लांडगे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सुरेखा सातपुते व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने बाळाला जालना येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंबड ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अंबड पोलिसांनी त्या मातेसह अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केल्याचे सांगितले.

नागरिकांनी माहिती द्यावीजिल्ह्यात कोठे अर्भक, अनाथ बालक आढळले, तर नागरिकांनी तात्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, बाल कल्याण समितीशी संपर्क साधावा. प्रशासनाकडून बालकाची जबाबदारी घेऊन त्याला शिशुगृहात दाखल केले जाते. पालकाचा शोध न लागल्यास कायदेशीररित्या दत्तक पालकाची प्रकिया केली जाते.- एकनाथ राऊत, अध्यक्ष, बाल कल्याण समिती.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीpregnant womanगर्भवती महिला