शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराच्या आक्षेप अर्जावर आजपासून सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:51 IST

पालिकेने गेल्या पाच वर्षानंतर प्रथमच मालमत्ताकरात करवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आलेल्या आक्षेपांवर मंगळवारपासून सलग नऊ दिवस सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेने गेल्या पाच वर्षानंतर प्रथमच मालमत्ताकरातकरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जवळपास शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून नवीन कर आकारणीच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. या नोटीसा मिळाल्यावर नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. या वाढीव करवाढीला अनेकांचा आक्षेप आहे. यासाठी जालना पालिकेने आक्षेप मागविले होते. जवळपास ९ हजार आक्षेप अर्ज आल्याचे सांगण्यात आले. या आलेल्या आक्षेपांवर मंगळवारपासून सलग नऊ दिवस सुनावणी होणार आहे.जालना पालिकेला हक्काचे उत्पन्न मिळण्याचा स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर आणि नळपट्टी हे आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर मालमत्ता करात वाढ झालेली नव्हती. ही करवाढ करून त्यातून उत्पन्न वाढीचे प्रयत्न जालना पालिकेने केले आहेत. त्यानुसार एका सर्वेक्षण एजन्सीकडून श्हरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले.त्यात नवीन बांधकाम केले आहे, काय केले असल्यास ते किती केले आणि त्याची बांधकाम परवानगी घेतली आहे काय अशी माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार संबंधितांना त्यांच्या घराचे दर्शनी भागाचे छायाचित्रासह नोटीस बजावण्यात आल्या आहेत.जालना पालिकेत पुढील दहा दिवस ही सुनावणी होणार असून, यासाठी जालना जिल्हा नगररचनाकार दिपक नागोरकर हे पालिकेत येऊन अर्जांवर म्हणणे जाणून घेणार आहेत. त्यांनी दिलेला निर्णय हा जवळपास अंतिम राहणार असल्याचे सांगण्यात आले.नागोरकर यांना मदत करण्यासाठी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दहा स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. दररोज शंभर अर्जांवर सुनावणी करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले.आलेल्या अर्जांची छाननी करून ते विभागनिहाय वेगवेगळे केले आहेत. त्यामुळे सुनावणीच्यावेळी येणाºया नागरिकांना सुलभ पध्दतीने आपले म्हणणे मांडता येणार आहे. यावेळी नागरिकांनी येताना त्यांना जे काय पुरावे सादर करायचे आहे, त्याच्या सत्यप्रती सोबत ठेवावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जालना : सुनावणी संदर्भात सूचनाज्या अर्जदारांनी मालमत्ता करासंदर्भात आक्षेप अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोबाईल तसेच प्रत्यक्ष भेट देऊन सुनावणीसाठी हजर राहण्याचे कळविले आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी सकाळी ९ ते सायंकाळी पाच यावेळेत आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकर