जालना : बस आणि आशयर टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना जालना तालुक्यातील नाव्हा गावच्या शिवारात शनिवारी दुपारी घडली.
माहूरगडाकडे जाणारी बस नाव्हा शिवारात आली असता समोरून येणाऱ्या टेम्पोशी जोराची धडक झाली. या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, इतर २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात आयशर आणि बसचा चक्काचूर झाला.