शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजा करताना छंदही जोपासावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 01:05 IST

विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना मौजमजा करावी, यासोबतच छंद जोपासावा. यातून विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध गायिका सुजाता पटवा (मुथियान) यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना मौजमजा करावी, यासोबतच छंद जोपासावा. यातून विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध गायिका सुजाता पटवा (मुथियान) यांनी व्यक्त केले.जेईएस महाविद्यालयाच्याविद्यार्थीसंसदेचे उद्घाटन सुजाता पटवा यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून जालना एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, सचिव श्रीनिवास भक्कड यांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. तत्पूर्वी विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. राजेंद्र सोनवणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. पुढे बोलताना गायिका सुजाता पटवा म्हणाल्या, ध्येय साध्य करण्यासाठी मोठ्या शहरातच जावे असे नाही. छोट्या शहरातूनही ध्येय प्राप्ती करता येते, यासाठी विद्यार्थ्यांनी छंदावर प्रेम करावे, औद्यागिक क्षेत्रामध्ये आजही मुंबई, बंगळूरू सारख्या शहारातील नागरिक कामासाठी येतात. ते कुटुंबातील सदस्यांना दूर ठेऊन परिश्रम घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी ध्येय प्राप्तीसाठी परिश्रम घेणे हे क्रमप्राप्त आहे.‘ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पाणी.. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो, कुर्बानी’..हे गीतही सुजाता पटवा यांनी त्यांच्या खास शैलीत गायले. यावेळी टाळ््यांचा कडकडाट झाला.कार्यक्रमाला दिलीप शाह, कैलास खट्टर, प्रकाश त्रिवेदी, हसमुख रायठठ्ठा, सुभाष गोयल, श्रीकृष्ण जवळकर, विद्यार्थीसंसद उपाध्यक्ष सचिन पवार, सचिव भीमाशंकर बेद्रे, सचसचिव शुभम शेळके, मनिषा जायभाये यांच्यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालकांची उपस्थिती होती. प्रभारी प्राध्यापक डॉ. महावीर सदावर्ते यांनी सूत्रसंचालन केले.विद्यार्थी संसद अध्यक्ष प्रभू गाढे यांनी महाविद्यालयात झालेली वृक्षतोड यापुढे होऊ नये, असे सांगून एक कला शिक्षकाची नेमणूक करावी असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतीक साहित्य उपलब्ध करून पालकांसाठी वेटिंग रूम तयार करण्यात यावी, अशी मागणी प्राचार्यांकडे केली. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीParliamentसंसद