शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गाव कारभाऱ्यांचेच हात गैरव्यवहाराने बरबटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:43 IST

चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावाचा विकास करण्यासाठी ज्यांना सरपंच बनविले त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटत असल्याचे चित्र जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दाखल होणा-या तक्रारींवरून दिसून येते. चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे. यात शासकीय निधीतील अपहाराच्या तक्रारींचा भरणा असल्याचे दिसून येते.ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गावाचा कारभार हाकण्यासाठी सरपंचांची निवड केली जाते. शासन निर्णयानुसार आता जनतेतून सरपंच निवडले जात आहेत. सरपंच पदावर बसलेल्या व्यक्तीने विकास कामे करून ग्रामस्थांना मुलभूत सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. यात राज्य सरकारने १४ व्या वित्त आयोगांतर्गत सर्व निधी हा थेट ग्रामपंचायतीला वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १४ वित्त आयोगाचा सर्वच निधी हा थेट ग्रामपंचायत कार्यालयाला जमा होतो. या निधीतून गावात विविध विकास करणे गरजे असते. मात्र, ‘खुर्ची’त बसलेल्या काही सरपंचांनी शासकीय नियमांनाच धाब्यावर बसवून कामकाज केल्याचे चित्र आहे. अशा सरपंचांचे पितळ उघडे पाडण्याचे काम विरोधी सदस्य करीत आहेत.मागील वर्षभरात १४ व्या वित्त आयोगाच्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिका-यांकडे आल्या आहे. भ्रष्टाचारासह तिसरे अपात्य न दाखवणे, अवैध वाळू उपसा, अतिक्रमण, राजीनामा विहित मुदतीत न देणे यासह इतर तक्रारी जिल्हाधिका-यांकडे दाखल झाल्या होत्या. दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून जिल्हाधिका-यांनी आजवर ३० सरपंचांना अपात्र ठरवले आहे. दरम्यान, इतर काही ग्रामपंचायतीच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झालेल्या आहेत.जिल्हाधिका-यांकडे धडकल्या ४० तक्रारीतिसरे आपत्य न दाखवणे, आर्थिक लाभ, अवैध वाळू उपसा, अतिक्रमण, राजीनामा विहित मुदतीत न देणे यासह इतर कारणावरुन जिल्हाधिका-यांकडे ४० तक्रारी आल्या होत्या. चौकशीनंतर ३० सरपंचांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.या गावच्या सरपंचांवर झाली कारवाईजानफेळ, आनंदवाडी, मांडवा, आंबा, भारज खुर्द, लतीफपूर, कंडारी खु. रोषनगाव, श्रीकृष्णनगर यासह इतर गावातील सरपंच व डोल्हारा या गावातील उपसरपंचावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर वरुड बु. सुखापुरी, भाटेपुरी, मोहपुरी येथील सदस्यांवर विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर अनेकांनी पुढील न्यायालयीन लढाईही सुरू ठेवली असून, तेथील निकाल कोणाच्या बाजुने लागणार याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चाही सुरू असतात.

टॅग्स :sarpanchसरपंचcollectorजिल्हाधिकारीCorruptionभ्रष्टाचार