शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:40 IST

५० ते ६० महिलांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामविकाऱ्यांना घेराव घालून या विषयी जाब विचारला.

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. विशेषकरुन महिलांची पाण्याविना मोठ तारांबळ उडत आहे. पाणी टंचाईकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, संतप्त महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.गावात ग्रामपंचायत मालकीच्या तीन विहिरी तसेच दोन बोअर आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिमुळे विहिर आणि बोअरची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे एक महिन्यापासून गावातील पाणी पुरवठा विकस्ळीत झाला आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. गावात मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने असतांना मात्र, याकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चौदावा वित्त आयोग, कर वसूली, गाळ्याचे भाडे, तसेच आठवडी बाजाराच्या हर्राशीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र असे असतांनाही पाणी समस्यावर ग्रामपंचात प्रशासन कानाडोळा करत आहे. पाण्याविना गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांन निवेदन देऊन गावात टँकरणे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.मात्र अद्यापही टँकर सुरु करण्यात आला नाही. यामुळे संतप्त ५० ते ६० महिलांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामविकाऱ्यांना घेराव घालून या विषयी जाब विचारला. पाणी पुरवठा पूर्ववत करा अन्यथा यापेंक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येणार असल्याचे महिलांनी ग्रामसेवकाला फैलावर घेतले.यावेळी सूबाबाई राखुंडे,बबिता राखुंडे,वंदना पटेकर,मनीषा तोडकर, लता पाटील, सखु राखुंडे,आशाबी शेख, करिमा कुरेशी, विमल खरात, मथुरा नरवडे, नंदा सोनवणे सह आदी महिलांनी सरपंच जैतूनबी बागवान व उपसरपंच शोभा पटेकर व ग्रामविकास अधिकारी एन.एम मंदोडे यांना निवेदन दिले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMorchaमोर्चाWomenमहिला