लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे मंगळवारी परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.बालाजी मंदिरापासून प्रारंभ झाला. यात महिला, पुरूष तसेच युवक-युवतींचा मोठा सहभाग होता. प्रारंंभी प. पू. भास्कर महाराज देशपांडे (जाफराबाद) यांच्या उपस्थितीत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शेष महाराज गोंदीकर, रामदास महाराज आचार्य, विनायक महाराज फुलंब्रीकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, भास्कर अंबेकर, विलास नाईक, कल्याणराव देशपांडे, अध्यक्ष डॉ.संजय रूईखेडकर, सिध्दी मुळे, रवींद्र देशपांडे, दीपक रणनवरे, संजय देशपांडे, अशोक पागारकर आदींंचा मिरवणुकीत सहभाग होता.
‘जय परशुराम’च्या निनादात जालन्यात भव्य मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:32 IST