शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. सदस्यांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:51 IST

ग्रामपंचायत च्या मासिक बैठकीची नोटीस सदस्यांना देऊन नोटीस देणारे ग्रामविकास अधिकारी बैठकीस हजर राहिले नसल्याने ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायतला सोमवारी टाळे टोकून रोष व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : ग्रामपंचायत च्या मासिक बैठकीची नोटीस सदस्यांना देऊन नोटीस देणारे ग्रामविकास अधिकारी बैठकीस हजर राहिले नसल्याने ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायतला सोमवारी टाळे टोकून रोष व्यक्त केला.मागील तीन महिन्यापासून गावात भागवत तंबरे हे काम करीत आहेत. परंतु वारंवार ग्राम सेवक गैरहजर राहत असून त्यामुळे गावातील समस्या कशा सोडवाव्यात, असा आरोप ग्राम पंचायत सदस्यांनी यावेळी केला. कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत आहे. सुरवातीला ग्रामसेवक हजर राहत नसल्याचे कारण सांगत होते. आता नवीन ग्रामसेवक रुजू होऊनही गावातील समस्या कायम आहेत.गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत ने कुंभार पिंपळगावात कुठलाही व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाकडून १०० रुपये वसूल करण्यात आले असल्याने अनेक व्यापारी रोष व्यक्त करत आहेत. या संदर्भात सरपंच , ग्रामसेवक यांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठकीसाठी सर्व सदस्यांना नोटीस पाठवून बैठकीला उपस्थित राहण्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे सर्वजण सकाळ पासून उपस्थित झाले. सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांची त्यांनी दुपारी एक वाजेपर्यंत वाट पाहिली. परंतु ते न आल्याने, संतप्त ग्रा.प.सदस्य अंकुश रोकडे, शिवाजी कंटुले, भुजंग कंटुले, शेख बुठण शेख गुलाब, शेख राजू शेख नबी, नामदेव राऊत, नानाभाऊ महानोर, अशोक उंदावत (पंचायत समिती सदस्य) व ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयास कुलूप ठोकले. या प्रकारामुळे दिवसभर गावात चर्चेला उधाण आले होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcivic issueनागरी समस्याagitationआंदोलन