शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारला शेवटची संधी"; मनोज जरांगेंचा उपोषण सुरू करण्यापूर्वी निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:13 IST

मनोज जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की, आता त्यांना फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या लागतील.

- पवन पवार वडीगोद्री (जालना): "पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत, जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही."; असा निर्वाणीचा इशारा सरकारला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत असलेले जरांगे यांनी आज रात्री पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. जरांगे यांच्या या उपोषणामुळे सरकारवर तातडीने काही निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.

जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की, आता त्यांना फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या लागतील. त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका करत, राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे. यासाठी शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचे काम पुन्हा सुरू करावे. तसेच, आंदोलकांवरील सर्व गुन्हे माफ करण्यात यावेत, अशा मागण्या केल्या. 

जरांगे पाटील भाजपच्या मराठा नेत्यांनाही इशारा दिला की, "जर आरक्षण दिलं नाही, तर देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले जाईल. मराठा समाजाने राजकारणाचा भाग न होता आपले ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे." जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, भुजबळ वयाच्या अखेरीस चुकीचे काम करत आहेत. त्यांनी धनगर समाजाला सांगितले की, "तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. छगन भुजबळ यांच्या भडकावण्याला बळी पडू नका." आम्हाला राजकारणात जायचे नाही, मात्र समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी हा लढा उभारला आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

सरकारला अखेरचा इशारा अन् हे शेवटचे उपोषणजरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यातील सर्व घटनांना सरकार जबाबदार असेल. "रात्री १२ किंवा १ वाजता आमरण उपोषण सुरु करत आहोत. हे शेवटचे आंदोलन असेल, आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुम्हाला बोंबलत बसावं लागेल," असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना