शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मागण्यांचा सरकारला विसर; गोदाकाठच्या गावांचा पुन्हा उपोषणाचा एल्गार

By महेश गायकवाड  | Updated: March 27, 2023 19:48 IST

वडीकाळ्या गावातील उपाेषणाच्यावेळी सरकारने १४ मागण्या मान्य केल्या होत्या.

जालना : मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या १४ मागण्या शासनाने मान्य केल्या. परंतु, त्यातील एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे सकल मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला असून, सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेण्यासाठी जालना आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या ८३ गावांनी वडीकाळ्या गावात पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात तहसील कार्यालयाला सोमवारी निवेदन देण्यात आले.

५ फेब्रुवारीपासून वडीकाळ्या गावात गोदाकाठच्या गावांनी आमरण उपोषण सुरू केले होते. संपूर्ण वडीकाळ्या गाव यात सहभागी झाले होते. त्यावेळेस सरकारने तत्काळ १४ मागण्या मंजूर केल्या होत्या. या सर्व १४ मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, दोन महिन्यानंतरही एकाही निर्णयाची सरकारने अंमलबजावणी केली नाही. सरकारने मंजूर केलेल्या १४ मागण्यांची २९ मार्च २०२३ पूर्वी अंमलबजावणी न केल्यास जालना आणि बीड जिल्ह्यातील ८३ गावांच्या वतीने ३० मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या मागण्या सरकारने केल्या होत्या मंजूरवडीकाळ्या गावातील उपाेषणाच्यावेळी सरकारने १४ मागण्या मान्य केल्या होत्या. यात महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची सोय, ओबीसी समाजाप्रमाणे शैक्षणिक व शासकीय नोकरीत सवलत, प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेचे उपकेंद्र, कोपर्डी खटल्याचा निकाल, मराठा आरक्षणासाठी न्यायालयात सक्षम बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ विधिज्ञांची नियुक्ती यासह अन्य मागण्यांचा त्यात समावेश होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना