लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादीचे भाऊसाहेब गोरे यांना बुधवारी पोलिसांनी नजर कैदेत ठेवले होते.राष्ट्रवादीचे भाऊसाहेब गोरे यांनी शेतकऱ्यांसह इतर अनेक प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंठा पोलिसांनी मुंबई अधिनियम नियमानुसार कलम ६८ प्रमाणे बुधवारी सकाळी ८ वाजता गोरे यांना राहत्या घरी स्थानबध्द करण्यात आले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मंठा पोलीस ठाण्यात आणून मोदी यांची सभा संपेपर्यंत नैजरकैदत ठेवले. दरम्यान, मला नजर कैद करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांची जनसंवाद यात्रा झाली. त्यावेळीही मंठा पोलीस ठाण्यात नजरकैद करण्यात आले होते, असा आरोप गोरे यांनी केला. तसेच हे प्रश्न सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरे पोलिसांच्या नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:08 IST