शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एक शेळी शेतकऱ्याचे मरण टाळते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:43 IST

प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अ‍ॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते.

प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अ‍ॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते. कृषी विद्यापीठातील संशोधनाचा वापर शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्हावा, हा त्यामागचा उद्देश. मला जे गाव मिळाले तिथे लोक मेंढीपालन करायचे. पण, त्यांची पुढची पिढी ते सोडून नोकरीच्या शोधात होती. त्यांची कारणे शोधली तेव्हा सामाजिक अप्रतिष्ठा, हेटाळणीची वागणूक आदी कारणे पाहणीत पुढे आली.नंतर मी अभ्यासक्रम पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत लाखाच्या पगारावर रुजू झालो; पण आपण खत विकण्यासाठी इतके शिकलो का, असा प्रश्न पडायचा. एक दिवस नोकरी सोडली आणि घरी आलो. नोकरी सोडली, आता शेळीपालन करणार असे सांगितले. त्यांचा विरोध सुरू झाला. मी निर्णयावर ठाम होतो. त्यामुळे त्यांनी गावातील लोकांना माझी समजूत काढायला लावली. ते यायचे, शेळीपालनातील धोके सांगायचे. मी फक्त ते धोके नोंद केले आणि सुरुवातीलाच प्रतिबंधात्मक उपाय केले. शेतकºयांना मला सांगायचे की, अर्ध्याहून अधिक आयुष्य गावात गेलेले असेल तर तुम्हाला शहरात राहताना गुदमरल्यासारखे होते ना? पण ज्यांचा जन्मच तिथे झालाय ते मस्त राहताहेत. बंदिस्त शेळीपालन करताना हीच खबरदारी घ्यायची की, तीच शेळी वा मेंढी बंदिस्त राहू शकते जिचा जन्म तिथे झालेला असतो. शेळी आणि मेंढी शेतकºयाला आर्थिक बळ देणारा महत्त्वाचा घटक आहे. औरंगाबादमधील एका संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की, ज्या घरात एक-दोन शेळ्या-मेंढ्या आहेत, तिथे शेतकरी आत्महत्या झालेली नाही. यामागचे कारण एका महिलेने सांगितले. दोन-चार शेळ्या असतील. आर्थिक चणचण झाली, तर पटकन ती विकता येते. त्यातून आलेल्या पैशांतून एक महिना निघून जातो. शेतकºयांच्या आत्महत्या फार मोठ्या पैशांसाठी होत नाहीत. कधी कधी हजार दोन हजार रुपयांसाठीही शेतकरी गळफास घेतो, अशावेळी एक शेळी शेतकºयाला जीवदान देते. त्यामुळे शेळीपालन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.(शब्दांकन - विकास व्होरकटे)

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी