शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालयांना भेटी द्या; मुलींचे प्रश्न जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 01:11 IST

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. शिवाय ठाण्यात येणाऱ्या तक्रार अर्जांची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महिला, मुलींची छेड-छाड रोखण्यासाठी दामिनी पथकासह ठाणेस्तरावरील विविध पथकांनाही सूचना दिल्या आहेत.हैदराबाद येथील अमानवीय घटनेचा जिल्ह्यात सर्वच स्तरातूून निषेध केला जात आहे. महिला, मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी जिल्हा पोलीस दलातील विविध पथकांसह ठाणे प्रभारींना दक्षता व उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालयातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यरत करण्यात आले आहे. पोउपनि पल्लवी जाधव आणि त्यांचे सहकारी शाळा, महाविद्यालयासह खासगी शिकवणीच्या परिसरात, बाजारपेठेत गस्त घालत आहेत. शिवाय येणा-या तक्रारीनुसार कारवाईही हे पथक करीत आहे. दामिनी पथकासह ठाणेस्तरावरील प्रभारी अधिकाऱ्यांनीही महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घ्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. गस्तीवर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांनाही शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, खासगी शिकवणीला भेटी देणे, या परिसरातील टवाळखोरी करणाºयांवर कारवाई करणे, महिला, मुलींकडून येणाºया तक्रारींची तात्काळ दखल घेत शहानिशा करून कारवाई करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिल्या आहेत. शिवाय शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेऊन महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना देण्यासही सूचित केले आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील विशाखा समित्यांनीही सतर्क रहावे, याबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले.महिला, मुलींनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, यासाठी १०० व १०९१ हा टोलफ्री क्रमांक २४ तास सेवेत ठेवण्यात आला आहे.ठाणे प्रभारी अधिका-यांनी आपले मोबाईल नंबर शाळा, महाविद्यालयांमध्ये द्यावेत, मुलींशी संवाद साधवा, मुलींनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात, सुरक्षात्मक वातावरण व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाJalna Policeजालना पोलीसWomenमहिलाSchoolशाळाcollegeमहाविद्यालय