शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलचा हप्ता हवा, ५ हजारांची लाच द्या; कंत्राटी कनिष्ट अभियंत्यास कार्यालयातच रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:04 IST

भोकरदन पंचायत समितीच्या कार्यालयातच एसीबीने केली कारवाई

- फकिरा देशमुखभोकरदन: घरकुलचा दुसरा हप्ता देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोकरदन पंचायत समितीच्या कंत्राटी कनिष्ट अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सकाळी पंचायत समितीच्या कार्यालयात एसीबी पथकाने केली. येथील पंचायत समितीमध्ये घरकुलचा पहिला, दुसरा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्यात येत होती. त्यामुळे लाभार्थी वैतागले आहेत. कंत्राटी कनिष्ट अभियंता लाचेच्या जाळ्यात अडकल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

तालुक्यातील शेलुद येथील एका लाभार्थ्यांला घरकुल मंजूर झालेले होते. बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता देण्यात देण्यात आला होता, मात्र दुसरा हप्ता मिळावा यासाठी संबधीत लाभार्थी पंचायत समितीचे कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड यांच्याकडे वारंवार विनंती करत होता. यावेळी राठोड याने दुसरा हप्ता पाहिजे असल्यास 20 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर 5 हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्याने जालना येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे धाव घेतली. विभागाने लाचेची मागणी केल्याची पडताळणी करून  पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. आज सकाळी राठोड याने तक्रारदारांकडून 5 हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

घराची झडती होणारही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळू जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, कर्मचारी, श्रीनिवास गुडूर, अमोल चेके, शिवा खुळे, बिनोकर यांनी केली. राठोड यास पथकाने अटक केली असून त्याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक कंडारी ( तालुका बदनापूर ) येथे गेल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJalanaजालना