शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

थेट लढतीत राजेश टोपे यांना फटका; शिंदेसेनेचे हिकमत उढाण यांनी घेतली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:36 IST

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला आहे

घनसावंगी : शरद पवार राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांना घनसावंगीत धक्का बसला असून शिंदेसेनेचे हिकमत उढाण हे आघाडीवर आहेत. टोपे आणि उढाण यांना भाजपचे बंडखोर अपक्ष सतीश घाटगे यांनी आव्हान दिले होते. मात्र, यंदा मतविभागणी न झाल्याने टोपे यांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला असून, यंदा ते षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. तर  शिवसेना शिंदे गटाने जागा वाटपात अखेरपर्यंत जोर लावत ही जागा आपल्याकडे खेचली आणत, टोपे यांचे राजकीय विरोधक हिकमत उढाण यांना पुन्हा उमेदवारी दिली. या मतदारसंघात टोपे विरूद्ध उढाण अशी थेट लढत राहिली. परंतु, भाजपला सोडचिठ्ठी दिलेले सतीश घाटगे आणि उद्धव सेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे हे बंडखोर देखील रिंगणात उतरले आहेत. मात्र, त्यांना अपेक्षित मते मिळाली नसल्याचे दिसून आले. 

मतदारसंघात पाचव्या फेरीपर्यंत हिकमत उढाण : 20 हजार 508राजेश टोपे. : 17 हजार 570सतीश घाटगे : 4 हजार 686शिवाजी चोथे: 415कावेरी खटके: 5 हजार 355उढाण 2 हजार938 मतांनी आघाडीवर आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपे