शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांनी शिल्लक वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:23 IST

शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करताना प्रथम त्या मंडळांनी न्यास नोंदणी कार्यालयाकडे रीतसर अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. या अंतर्गत जालन्यातील जवळपास १८० गणेश मंडळांनीच ही परवानगी घेतल्याचे दिसून आले. असे असले तरी आता वर्गणीचा हिशोब नीट ठेवून, शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या काही वर्षापासून न्यास नोंदणी कायद्या अंतर्गत गणेश मंडळांना परवानगी घेणे आणि हिशोब नीट ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. ही बाब गंभीर आहे.आता गणेश उत्सवाची सांगता होत आहे. परंतु भविष्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशाची स्थापना करण्यापूर्वी न्यास नोंदणी विभागाची परवानगी तसेच हिशोबाचा ताळेबंद सादर करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.जालन्यात जवळपास १८० गणेश मंडळांनी परवागी घेतल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच राज्याच्या अन्य भागात पूराने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या भागातील गरजूांना आजही मदतीची गरज आहे. ही मदत माणूसकीच्या दृष्टीकोनातून करण्यात येणार असल्याने गणेश मंडळांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन येथील सहायक धर्मदाय आयुक्त एस.बी माने आणि कार्यालयीन अधीक्षक आर.डी. पांचाळ यांनी यांनी केले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Socialसामाजिकfloodपूर