शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून रंगणार डाव-प्रतिडावांचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:42 IST

जालना शहरात २००२ नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात २००२ नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेची आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. या स्पर्धेत बुधवारी सकाळी प्रारंभी मल्लांचे वजन आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन दुपारी तीन वाजेनंतर कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले.एकूणच जालन्यात होणाºया स्पर्धेसाठी राज्यभरातून ४५ संघ सहभागी होणार असून, त्यात ९०० मल्लांचा समावेश राहणार आहे. तर कुस्तीचे पंच आणि कुस्ती महासंघाचे पदाधिकारी तसेच अन्य तांत्रिक कर्मचारी मिळून एक हजार २०० जण जालन्यात दाखल झाले आहेत, तर काही संघ हे बुधवारी सकाळी येणार आहेत. जालन्यात कुस्तीची मोठी आवड ही पूर्वीपासूनच आहे. जालन्यातील स्व. चरण पहेलवान, रूपा पहेलवान, भरत पहेलवान यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील विशेष करून कुस्तीची आवड आणि ती जोपासण्यासाठी येथील अहिर गवळी आणि महाराष्ट्रीय गवळी समाजाचा सिंहाचा वाटा आहे.पूर्वी जालन्यातील बहुतांश भागात लाल मातीचा हौदा असलेल्या तालीम होत्या. मात्र आता त्या तालीमची जागा अत्याधुनिक जीमने घेतली आहे. पूर्वी तालीम उभारणीसाठी शासनाकडून अनुदान मिळत होते, ते आता बंद झाले असून, अत्याधुनिक जीम उभरण्यासाठी आता अनुदान मिळत आहे. एकूणच लाल मातीतील कुस्ती गादीवर घेण्याची पाश्चिमात्य देशातील पध्दत भारतातही रूजू झाली आहे. आॅलिप्पिंक स्पर्धेत गादीवरीलच कुस्ती खेळली जात असल्याने त्याला मोठे महत्व आले आहे.असे असले तरी महाराष्ट्र कुस्तीगिर संघटनेने माती आणि गादीवरील कुस्तींना समान संधी देऊन एक प्रकारे आधुनिक आणि लाल मातीतील कुस्तीला टिकवून ठेवली आहे.आझाद मैदानावर होऊ घातलेल्या या कुस्तीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून, जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामुळे शहरात उत्साही वातावरण आहे.जालन्यात पाच दिवस होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे पहेलवानांसाठी मोठी पर्वणी असते. यात प्रत्येकालाच विजय मिळेल असे नाही, परंतु आपल्यातील चपळतेने समोरच्या पहेलवानाला अस्मान दाखविण्यासाठी प्रत्येकजण तयारीला लागल्याचे दिसून आले. येथील डॉ. दयानंद भक्त महाविद्यालय परिसरात मंगळवारी फेरफटका मारला असता, जालना जिल्ह्यातील कुस्ती संघातील मल्ल आपली जोर आजमाईश करताना दिसून आले.या स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यू ट्यूबवरून या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे जवळपास ५५ देशात थेट प्रक्षेपण करण्यासाठीची उपाययोजना संयोजकांनी केली असून, या संदर्भात स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच डॉ. दयानंद भक्त, लक्ष्मण सुपारकर, गणेश सुपारकर यांच्यासह संजय खोतकर, संतोष मोहिते यांनी भेट देऊन सायंकाळी पाहणी केली. तसेच प्रक्षेपणा संदर्भात संजय खोतकर यांनी सांगितले की,महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन ती परदेशातील कुस्ती प्रेमींनाही दिसावी हा यामागिल हेतू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीJalanaजालना