शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

खेळाकडे करिअर म्हणून पाहावे - गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:37 IST

विद्यार्थी दशेत खेळाकडे करिअर म्हणून पाहावे, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होतोच; शिवाय करिअर म्हणून खेळल्यास अव्वल खेळाडूंची प्रशासनात उच्च पदांवर नियुक्ती होते. खेळाडूंसाठी अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थी दशेत खेळाकडे करिअर म्हणून पाहावे, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिला.अंबाजोगाई येथे १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या राज्यस्तरीय कुमार-कुमारी अजिंक्य निवड चाचणी करिता जालना जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्ह्याचा संघ निवडीसाठी मंगळवारी अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या प्रांगणात निवड चाचणीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. रमेश भुतेकर, शांतीलाल राऊत, डॉ. संजय शेळके, डॉ. भुजंग डावकर, आयोजक बी. जे. पाटोळे, प्रा. सुभाष देठे, संजय येळवंते, राजाभाऊ थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, खेळातून निर्णय क्षमता वाढीस लागते. तसेच मित्रत्वाची भावना वृध्दिंगत होत असून, सांघिक भावनेतून खेळाडूंनी राज्यात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन रवींद्र ढगे यांनी केले. शांतीलाल राऊत यांनी आभार व्यक्त केले. निवड चाचणीत जिल्हाभरातील २० संघातील २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून बाद पध्दतीने १९ सामने खेळविण्यात येत आहेत. पंच म्हणून बाबासाहेब मंडाळे, परमेश्वर जाधव, गणेश ढगे हे काम पाहत असून, जिल्हा निवड समितीत रवींद्र ढगे, अंबादास गिते, पंजाब वाघ, विठ्ठल दिवटे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAmbajogaiअंबाजोगाईMaharashtraमहाराष्ट्र