जालना शहरातील शिवाजी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील डॉक्टर, स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी सविस्तर विचार मांडून कोरोनात डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यक्रमात सुखलाल कुंकूलोळ, प्रभावती भंडारी, गंगाबाई शेलगावकर, रहैमत बेगम शब्बीर अली यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोडके, डॉ. प्रशांत बादल, डॉ. आशिष राठोड, डॉ. संजय जगताप, डाॅ. लता घोडके, डॉ. प्रल्हाद धारूरकर, डॉ. सूरज राठोड, डॉ. अपूर्वा भुतेकर, डॉ. हर्षदा कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव धैर्यशील चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. विनायक भोरे, विजय चव्हाण, पं.स. सदस्य मुकेश चव्हाण, सरपंच राजेश पवार, युवराज राठोड, पद्माकर हांडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास मुख्याध्यापक विलास वायाळ, वसंत घुगे, मीरा पवार, प्राचार्य नालेगावकर यांच्यासह अन्य शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
डॉक्टरांच्या प्रयत्नाने कोरोनावर मात- गडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST