काजळ्यातील शिबिरात १०१ दात्यांचे रक्तदान
बदनापूर : तालुक्यातील काजळा येथे आयोजित रक्तदान शिबिरात १०१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला युवकांसह ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीला निवेदन
आष्टी : येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण तत्काळ हटवावे, अशी मागणी लिंगायत समाजाच्यावतीने ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब साखरे, रमेश उमरे, लक्ष्मण औटी, अरूण डोईजडकर, विक्की व्यवहारे, ईश्वर रेनगाडे, अजय ढेपे, संजय थोरात, राजेश उबाळे आदी उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर युवकांचे उपोषण मागे
मंठा : तालुक्यातील आरडा तेलाजी येथील साठवण तलावाकडे जाणाऱ्या रस्ता कामाच्या चौकशीसाठी युवकांनी उपोषण केले. मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता के. जे. कुचे यांनी या रस्ता कामाची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी प्रकाश नानवटे, सदाशिव नानवटे, मधुकर नानवटे, गोविंद नानवटे, विलास चव्हाण, प्रकाश नानवटे, उमेश नानवटे, ओम नानवटे, किशोर नानवटे, दिगंबर गोरे, चेतन शिंदे, विक्रम नानवटे उपस्थित होते.