कंपनीत उभी केलेली दुचाकी लंपास
जालना : कंपनीत उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना औद्योगिक वसाहत भागातील भाग्यलक्ष्मी रोलिंग कंपनीत घडली. याप्रकरणी बाबूराव दगडुबा चव्हाण (माउलीनगर, अंबड रोड, जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वेताळ हे करीत आहेत.
क्रेडिट ब्रँचमधून १ लाख रुपये लंपास
जालना : बँकेच्या ब्रँचमधील टेबलवर असलेली चावी नजरचुकीने घेऊन ब्रॅँचचे लॉकर उघडून १ लाख ३ हजार ९४६ रुपये चोरून नेल्याची घटना परतूर शहरातील आठवडी बाजारासमोरील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड ब्रँचमध्ये घडली. याप्रकरणी मुंजाभाऊ जनार्दन खापरे (खासगी नाेकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम उत्तम वाघ (जवखेडा ठोंबरे, ता. भोकरदन) याच्याविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोडखे हे करीत आहेत.
सौरपंपाची प्लेट नेली चोरून
जालना : शेतातील विहिरीवर लावण्यात आलेली सौरपंपाची चार्जर प्लेट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील शिराळा शिवारात घडली. याप्रकरणी सतीश कसारे या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक वैद्य हे करीत आहेत.