शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चार हजार शेतकऱ्यांचे मोफत माती परीक्षण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:18 IST

पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाच्याकडून तब्बल ४ हजार ३९० शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोफत मातीपरीक्षण करुन दिल्याने खरीप पेरणीच्या वेळी शेतक-यांना चांगला फायदा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढत्या रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीचा पोत बिघडला आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाच्याकडून तब्बल ४ हजार ३९० शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोफत मातीपरीक्षण करुन दिल्याने खरीप पेरणीच्या वेळी शेतक-यांना चांगला फायदा झाला.सलगच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करत आहेत. परिणामी दिवसे- दिवस शेतीचे आरोग्य बिघडत चालेले आहे. शेतीत खर्च करुन पुरेशा प्रमाणात उत्पन्न न निघाल्याने अनेक शेतकरी हतबल होतात. यातूनच आत्महत्या सारख्या घटना घडत आहेत. यामुळे शेतक-यामध्ये जनजागृती करुन पेरणीपूर्वी शेतक-यांच्या जमिनीची आरोग्य तपासणी करुन जमिनीत कोण- कोणत्या घटकांची कमतरता आहे. याची माहिती द्यावी, या चांगल्या हेतूने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत २०१९ या आर्थिक वर्षापासून केंद्र आणि राज्यशासनाने पायटल प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतक-यांच्या जमिनीची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे धोरण आखले आहे. यासाठी जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी विभागाला सूचना करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात मृदा परीक्षण विभागाने ४ हजार ३९० शेतक-यांचे मोफत माती परीक्षण करुन दिले.तसेच रासायनिक खताचा वापर थांबवून शेणखताचा वापर शेतात करावा याबाबत शेतक-यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचा फायदा शेतक-यांना होत आहे.शेतक-यांच्या शेतातील माती परीक्षणातून स्फुरद, नत्र, आणि जस्त या मूलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्हा मृद विभागाच्या वतीने शेतक-यांना माती परीक्षणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाला गती देण्यासाठी यावर्षी केंद्र आणि राज्य शासनाने २०१९ - २०२० या वर्षासाठी पायलट योजनेअंतर्गत शेतक-यांच्या जमिनिचे माती परीक्षण मोफत करण्यात येत आहे.माती परीक्षणाच्या तंत्रात अनेक बदल केले आहेत. पूर्वी १० हेक्टरच्या परिसरातील एका शेतक-याच्या जमिनीत माती नमुन्याची तपासणी करुन परिसरातील दहा शेतक-यांना सारखाचा माती परीक्षणाचा अहवाल देण्यात येत होता. अनेकवेळा यात गफलत होत असल्याने शेतक-यांचे नुकसान व्हायचे यामुळे शासनाने यात बदल करुन आरोग्य पत्रिका वाटप केलेल्या आहेत.प्रत्येक खातेदाराच्या शेतातील माती नमुन्याची तपासणी करण्याचे आदेश शासनाने मृद तपासणी विभागाला दिले होते. यामुळे पहिल्या टप्प्यात जालना तालुक्यातील धावेडी, बदनापूर तालुक्यातील पाडळी भोकरदनमधून सुबानपूर, जाफराबाद मधून पिंपळखुटा, परतूरमधून आनंदगाव, मंठा तालुक्यातून पांगरी खुर्द, अंबड, मार्डी, घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव आदी गावातील शेतक-यांचे माती परीक्षण करण्यात आले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी