शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२२०० एचआयव्ही ग्रस्तांना मिळणार मोफत बसची पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:37 IST

जिल्ह्यातील २,२०० एचआयव्ही बाधित रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच एचआयव्ही बाधित रुग्णांना ये-जा करण्यासाठी मोफत पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २,२०० एचआयव्ही बाधित रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार असून, लवकरच रुग्णांना ही पास देण्यात येणार आहेत.राज्यात एचआयव्हीच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात आहे. या एचआयव्ही बाधित रुग्णांना दर महिन्याला औषधोपचाराकरिता उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात ये-जा करावी लागते. एचआयव्ही बाधित रुग्णांना ये-जा करण्यासाठीच जास्त खर्च लागतो. या रुग्णांचा खर्च कमी करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने मोफत बस पास देण्यात येणार आहे. या रुग्णांना दर महिन्याला ५० कि.मी.पर्यंत या पासने जाता येईल.जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २२०० एचआयव्ही बाधित रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात १७७ बालके, १०५२ पुरुष, ९९५ महिलांचा समावेश आहेत. दरम्यान, लवकरच या रुग्णांना ही पास उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे शासकीय जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.५० किलोमीटरच करता येणार प्रवासएचआयव्ही बाधित रुग्णांना दर महिन्याला तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी औषधोपचारासाठी यावे लागते. याचे अंतर ४० ते ५० किलो मीटर असल्यानेच या योजनेचा ५० किलोमीटरचा प्रवास ठेवण्यात आला आहे.जिल्ह्यातील औषधोपचार केंद्रेजालना जिल्ह्यात एचआयव्ही ग्रस्तांसाठी पाच औषधोपचार केंद्रे आहेत. अंबड, परतूर, मंठा, घनसावंगी, भोकरदन तालुक्यांमध्ये औषधोपचार केंद्रे असल्याचे शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला असून, याबाबत आम्ही विभाग नियंत्रकांना पत्र देणार असल्याचे जिल्हा पर्यवेक्षक राजेश गायकवाड, जिल्हा सहायक कार्यक्रम अधिकारी विलास कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :HIV-AIDSएड्सstate transportराज्य परीवहन महामंडळSocialसामाजिक