शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या माध्यमातून ओढले जाळ्यात; १ किलो सोन्याचे नाणे देतो सांगून १० लाखाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 13:35 IST

शेतामध्ये खोदकाम करताना सोन्याची नाणी भरलेला एक हंडा सापडला असल्याची सांगून फसवणूक

परतूर ( जालना): मला शेतात सोन्याचा हंडा सापडला आहे. यातील एक किलो सोने दहा लाख रुपयात देतो म्हणून नकली सोने देऊन दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी परतूर पोलिसात तिघा जणांविरोधात करण्यात आला आहे.

फेसबुकवर एका पंधरा वर्षाच्या मुलाशी मैत्री करून शेतात सोन्याचा हंडा सापडला आहे. तुलाच कमी पैशात देतो असे सांगितले. ही सर्व हकीकत मुलाने घराशेजारी राहणार्‍या व्यक्तिला सांगितल्यानंतर कमी पैशात सोने मिळत असल्याच्या आमिषातून दोघामित्रांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात दि. ११ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरख रावसाहेब लांब रा. तांबवा ता. केज.जि.बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील शेजारी राहणारा मुलगा महादेव कोल्हे ( १५ ) हा एप्रिल महिन्यात एक दिवशी येऊन म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवरुन एक मित्र झाला आहे. त्याला शेतामध्ये खोदकाम करताना सोन्याची नाणी भरलेला एक हंडा सापडला असून विकायचा आहे. तुला खुप कमी किंमतीत देईल तू एकदा परतूर रेल्वे स्टेशनच्या पुलाजवळ येऊन सोने पाहून एक नमुना दाखविण्यासाठी घेवून जा, असे फोनकरून सांगत आहे.

त्यानंतर महादेवकडून काही फोन नंबर घेतले. दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन पाहिला असता, त्यांनी परतूर रेल्वे स्टेशनच्या पुलाजवळ येण्यास संगितले. दि २३ एप्रिल २०२२ रोजी केजवरुन दोघे जन मित्र कारने परतूर येथे रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्याकडे एक सोन्याचे नाणे सम्पल दाखविले ते खरे वाटले व त्यानंतर त्यांना म्हणालो की, चला आपण रेल्वे गेटजवळ ज्यूस घेऊ. यावेळी त्याने शामराव पवार असे नाव सांगितले.  सोबत पत्नी व मुलगा असल्याचे सांगून शेतामध्ये खोदकाम करित असताना एक सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यामधील काही एक कळत नसुन आम्ही  गरीब आहोत. पोलीसाची भिती वाटत असल्यामुळे जास्त कोणी ओळखीचे लोक नाही. गावातील महादेव कोल्हे हा फेसबुकचा चांगला मित्र असल्यामुळे तुम्हालाच सोने विकायचे आहे. किती सोने विकत घेणार आहे असे बोलल्यानंतर त्यांना एक किलो सोने विकत घ्यायचे आहे. दहा लाख रुपये तुम्हाला देवू असे बोलल्यानंतर त्यांनी

त्यांच्याकडील एक सोन्याचे एक ग्रमचे नाणे तपासणीसाठी दिले. ते घेवून गावातील सोन्याच्या दुकानदाराकडे घेवून त्याची साहनिशा केली. खरे असल्याचे समजल्याने त्यांना परत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्यांना कळविले की, दि ४ मे रोजी रोजी सोने घेण्यासाठी येत आहोत असे त्याना फोनवर कळविले. दोघे मित्र कारने परतुर रेल्वे गेटच्या जवळ आल्यावर संपर्क केला असता त्यांनी मुलगा वाटुर रस्त्याला सोने घेवून थांबला आहे. तेथे जावू असे म्हणून ते दोघे जण पतीपत्नी असे वाटूर रस्त्यावर एका पुलाजवळ गेलो. तेथे एक मुलगा एका झाडाखाली बसलेला दिसल्यानंतर एका शेतामध्ये नेले. एका बॅगमध्ये असलेले सोने दाखविले. त्यांना दहा  लाख रुपयाची जमवाजमव झाली नाही. एक लाख रुपयाचे सोने दया असे बोलल्यानंतर त्यांनी सोने देण्यास नकार दिला. घ्यायचे असले तर एक किलो सोने घ्या असे बोलल्यानंतर तेथुन जाण्यासाठी निघालो असता त्यांनी थांबवुन सध्या इसार म्हणुन दहा हजार रुपये दया असे बोलले. त्यावेळी त्यांना इंसार म्हणुन दहा हजार रुपये दिले. परत गावी तांबवा येथे आलो. दोन दिवासामध्ये दहा लाखांची जमवाजमव करून पैसे घेऊन सोने विकत घेण्यासाठी येत असल्याचे कळविले. 

दि. ७ मे रोजी २०२२ रोजी कारने परतुरमध्ये आल्यावर त्यांनी वाटुर फाटा येथे या असे बोलल्यानंतर तेथे गेलो असता त्यांने वाटुर फाटा मंठा रोडजवळच नेले. त्यांच्या कडील असलेले सोने दाखविले. दहा लाख रुपये घेऊन तेथून निघून गेले. ते दिलेले सोने दुस-र्‍या दिवशी सोनाराकडे दाखविले असता सर्व  खोटे असल्याचे सांगितले.  हे ऐकून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांना मोबाईल वर संपर्क केला असता त्यांचे फोन बंद येत होते. फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्या तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला असता काही पत्ता लागला नाही. या प्रकरणी गोरख लांब यांच्या फिर्‍यादी वरुण शामराव पवार त्यांची पत्नी व मुलगा रा. खुरानपुर ता.लोणार यांनी दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे हे करीत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी