शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

जालना, अंबड आगारात प्रवाशांच्या दिमतीला चार नवीन ‘शिवशाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:56 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जालना विभागातील जालना व अंबड आगाराला प्रत्येकी दोन नवीन शिवशाही बसेस दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जालना विभागातील जालना व अंबड आगाराला प्रत्येकी दोन नवीन शिवशाही बसेस दिल्या आहेत. प्रवाशांच्या दिमतीला चार नवीन वातानुकूलित बसेस दाखल झाल्या असून, महामंडळाच्या उत्पन्न वाढीस या बसेस लाभदायक ठरणार आहेत.लांब पल्ल्याचा प्रवास करताना महामंडळाच्या बस ऐवजी खासगी बसेसकडे प्रवाशांचा अधिक कल दिसून येतो. खासगी बसमध्ये प्रवास करताना मिळणाऱ्या सोयी-सुविधा यास कारणीभूत ठरतात. याचा महामंडळाच्या आर्थिख उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. मात्र, ही बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना चांगल्यात चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवशाही बसेसकडे पाहिले जाते. लाल परीमुळे राज्य परिवहन महामंडळाचा जालना विभागही नफ्यात आलेला आहे. गत वर्षी जालना विभागीय कार्यालयाला बसच्या माध्यमातून निव्वल चार कोटी ३२ लाख रूपयांचा नफा मिळाला होता.मध्यंतरी एस.टी. महामंडाळाकडून खासजी तत्त्वावर काही शिवशाही बस चालविल्या जात होत्या. मात्र, आता महामंडाळाने वातानुकूलित ‘शिवशाही’ बसची बांधणी करण्याला सुरूवात केलेली आहे. यातील चार बस जालना विभागात आल्या आहेत. यातील दोन बस पंधरा दिवसांपूर्वी जालना आगारात दाखल झाल्या असून, दोन बस अंबड आगाराला देण्यात आल्या आहेत. जालना आगारातील बस जालना- पुणे या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. यातील एक बस सकाळी दहा वाजता जालना आगारात लागते. तर दुसरी बस रात्री दहा वाजता जालन्यातून पुण्याकडे रवाना होते. या दोन्हीही बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार प्रमुख पंडित चव्हाण यांनी सांगितले. उर्वरित दोन बस अंबड आगारात आहेत.यातील एक बस अंबड येथून सकाळी ११ वाजता पैठण मार्गे पुण्याकडे रवाना होत आहे. दुसरी बस जालना- औरंगाबाद मार्गे पुण्याला जात आहे. या बसेसद्वारे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या तीन बस जालना आगारात आठवडाभरात दाखल होणार आहेत. यापुढे दूरचा प्रवास प्रवाशांचा अधिकच सुलभ होणार आहे.

टॅग्स :state transportएसटीShivshahiशिवशाहीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स