शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात विदेशी बनावटीचे चार पिस्टल जप्त; चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 15:08 IST

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही पिस्टल जळगाव भागातून विकत आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

जालना : अवैधरित्या विदेशी बनावटीचे पिस्टल विक्री करणाऱ्यासह चौघांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून चार पिस्टलसह एक जीप जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री जालना शहरातील ढवळेश्वर भागात करण्यात आली.

जालना शहरातील ढवळेश्वर भागातील एक व्यक्ती अवैधरित्या पिस्टल विक्री करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना मंगळवारी रात्री मिळाली होती. या माहितीवरून पथकाने ढवळेश्वर भागात राहणाऱ्या परमेश्वर अंभोरे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान काही दिवसांपूर्वी चार पिस्टल विक्री केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. अंभोरे याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी ढवळेश्वर भागातच राहणारा गणेश ज्ञानेश्वर काकडे याच्याकडून दोन, कृष्णा सलामपुरे याच्याकडून एक पिस्टल जप्त केले. तर रामदास उत्तम मिसाळ (रा. जानेफळ ता.भोकरदन) याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आले. 

या चौघांनाही पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून चार पिस्टल, एक जीप असा ७ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील आरोपींविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि प्रमोद बोंडले हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि शामसुंदर कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडले, पोना नंदलाल ठाकूर, कर्मचारी देवाशिष वर्मा, अनिल काळे यांच्या पथकाने केली.

जळगाव भागातून आणले पिस्टल परमेश्वर अंभोरे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने ही पिस्टल जळगाव भागातून विकत आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ग्राहकांना मागणीनुसार त्याची विक्री करीत होता. पोलिसांनी अटक केलेल्या चौघांपैकी दोघांवर यापूर्वीच काही गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, संबंधितांनी पिस्टल कोणत्या कारणाने खरेदी केली याचा तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिसArrestअटक