शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू; मृतात सख्या भावंडांसह सालगडी बापलेकाचा समावेश

By विजय मुंडे  | Updated: June 6, 2023 19:52 IST

नातेवाईकांच्या हंबरड्यामुळे पानावले ग्रामस्थांचे डोळे

- दादासाहेब जिगेमठपिंपळगाव (जि.जालना) : शेततळ्यात बुडाल्याने दोन सख्या भावंडांसह बापलेकाचा मृत्यू झाला. एकाच दिवशी चौघांचा मृत्यू झाल्याने सामनगाव (ता.जालना) गावावर शोककळा पसरली होती. घटनास्थळी व जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.

भागवत कृष्णा पडूळ (वय-१०), ओमकार कृष्णा पडूळ (०८), युवराज भागवत इंगळे (०९) आणि भागवत जगन्नाथ इंगळे (३८ सर्व रा. सामनगाव ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत. जालना शहरापासून १० किलोमीटर अंतरावर सामनगाव हे गाव आहे. या गावातील कृष्णा पडूळ यांचे गावच्या शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात भागवत जगन्नाथ इंगळे हे सालगडी म्हणून काम करतात. भागवत इंगळे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतात कामाला गेले होते. सोबत त्यांचा मुलगा युवराजही होता. दुपारच्या सुमारास भागवत पडूळ, ओमकार पडूळ, युवराज इंगळे हे तीन मुलं शेतातील शेततळ्यावर गेली. शेततळ्यातील पाण्यात पोहण्यासाठी ते उतरले होते.

परंतु, पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यांचा आवाज ऐकताच बाजूला काम करीत असलेले भागवत इंगळे यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मुलांना वाचविण्यासाठी इंगळे हे ही शेततळ्यात उतरले. परंतु, त्या तीन मुलांसह भागवत इंगळे यांचाही तळ्यात बुडून मृत्यू झाला. बुडणाऱ्यांचा आवाज ऐकून शेततळ्यावर आलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांना आणि पोलिसांना माहिती दिली. काही युवकांनी शेततळ्यात उड्या घेवून मृतदेहाचा शोध घेणे सुरू केले. मृतदेह सापडत नसल्याने शेततळे एका बाजूने फोडण्यात आले हाेते. गावातील युवकांनी शेततळ्यातून त्या चौघांचे मृतदेह बाहेर काढले. तालुका ठाण्याचे सपोनि. खाडे, कर्मचारी मुंडे, मगरे, किशोर जाधव, ढाकणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मयतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगरकृष्णा पडूळ यांना भागवत आणि ओमकार ही दोनच मुले होती. भागवत इंगळे हे पडूळ यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. त्यांना एकूण चार आपत्य आहेत. त्यापैकी युवराज इंगळे हे एक आपत्य होते. शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पडूळ व इंगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJalanaजालनाDeathमृत्यूagricultureशेती