शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात हद्दपार आरोपीसह चारजण अटकेत; कारसह मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:58 IST

हद्दपार आरोपीसह चौघे जेरबंद

ठळक मुद्देतीन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली

जालना : चोरी, घरफोड्यातील हद्दपार आरोपीसह चार जणांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (दि.२३ )  सकाळी जालना शहरातील पॅलेस हॉटेलच्या मागे करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या कारसह १ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जालना शहरासह परिसरातील घरफोड्या, चोऱ्यांमधील आरोपी शहरातील पॅलेस हॉटेलच्या मागे आल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी दुपारी कारवाई करून गजानन सोपान सिगाडे (रा. पांचनवडगाव ता.जालना), हद्दपार असलेला हरदिपसिंग बबलूसिंग टाक (रा.गुरूगोविंदसिंग नगर, जालना), दियासिंग बरिहामसिंग कलानी (रा. हिन्दनगर जालना) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्या तिघांकडे चौकशी केल्यानंतर तीन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून देऊळगाव राजा येथून चोरलेली विना नंबरची एक कार, कटर, टामी, हातोडी व इतर असा एकूण १ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर ललूसिंग जिलेसिंग कलानी (रा. जालना) याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम.बी.स्कॉट, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, नंदकिशोर कामे, पोकॉ संदीप चिंचोले, राजू पवार, आकाश कुरील, विजय निकाळजे, श्रीकुमार आडपे यांच्या पथकाने केली.

टाक दोन वर्षासाठी हद्दपारएडीएसच्या पथकाने जेरबंद केलेला आरोपी हरदिपसिंग बबलूसिंग टाक हा दोन वर्षासाठी जालना, औरंगाबाद व बुलढाणा या जिल्ह्यातून हद्दपार आहे. शिवाय त्याच्याविरूध्द विविध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

इतर आरोपींवर अनेक गुन्हेएडीएसने पकडलेल्या गजानन सिगाडे याला नगर पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्याच्याविरूध्द चोरी, घरफोडीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. दियासिंग कलानी, ललूसिंग कलानी या दोघांविरूध्दही चोरी, घरफोडीसह इतर गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी आहे.

टॅग्स :ArrestअटकJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी