शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

'मदत लागल्यास सांगा, छत्रपतींचा वंशज म्हणून माझी जबाबदारी'; संभाजीराजेंनी घेतली जरागेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:07 IST

मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आपण स्थगित केलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचे रुपांतर आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणात करत आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. 

मराठा समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र चाळीस दिवस होऊनही ते मागे घेतलेले नाहीत.म्हणजेच सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. या आमरण उपोषणात आपण अन्न-पाणी आणि कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मी प्रामाणिकपणे येथे आलोय, काही मदत लागली तर सांगा, असं संभाजीराजे यांनी सांगितले. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी प्रयत्नशील, असं संभाजीराजे जरागेंना म्हणाले. छत्रपतींचा वंशज म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मनोज जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले पाहिजे. जरांगेंनी उपोषण करावे, पण किमान पाणी तरी प्यावे, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी यावेळी केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. परंतु, आत्महत्या होत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच नेतेमंडळींना गावबंदी करा, कायदा हातात घेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १६ ते १७ युवकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. एकूणच आजवर एकाही आश्वासनाची पूर्तता शासनाकडून झालेली नाही. यामुळे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जात आहे. 

शिवरायांची शपथ...मराठा आरक्षण देणारच!

शिवरायांची शपथ...मराठा आरक्षण देणारच. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला आश्वस्त केले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर  मंगळवारी पार पडला. मी देखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे, मला त्यांचे दुःख, वेदना कळतात. कोणावरही अन्याय न करता, कुणाचेही न काढून घेता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण