शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत तारा तुटून पाच दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:10 IST

वीज वितरण कंपनीची एल टी लाईनची तार तुटून बसस्थानकासमोरील पाच दुकानाला आग लागून ११ लाख रुपयांचे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : येथील वीज वितरण कंपनीची एल टी लाईनची तार तुटून बसस्थानकासमोरील पाच दुकानाला आग लागून ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता म्हणाले की, घटना घडली तेव्हा वीज पुरवठा बंद होता. यामुळे शॉर्टसर्किट व्हायचा प्रश्नच येत नाही.येथील कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील बसस्थानकासमोर शेख इस्माईल पिंजारी यांचे गादी घर आहे. बुधवारी सकाळी एल टी वीजेची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने त्यांच्या दुकानाला आग लागली. यात दुकानातील रूईच्या दोन मशीन, २० हजार रुपये किमतीचा कपडा २० हजार रूपयाचे पत्र्याचे शेड असा एकूण पाच लाख रूपयांचे नुकसान झाले. यानंतर या दुकानाच्या बाजूलाच असणाऱ्या शेख सत्तार यांचे राज मोटर रिवाइडिंग दुकान जळाले. त्यामध्ये मोटर पंप वेल्डिंग मशीन व इतर साहित्य असे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.संतोष पवार यांच्या किसान मोटार रिवायडींगलाही आग लागली. यात सहा मोटार पंप एसटीपी पंप, फॅन मीटर, ठिबक सिंचनाचे साहित्य असा दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच शेख बशीर यांचे लाकडी फर्निचर चे दुकानही जळाले त्यात दीड लाखाचे नुकसान झाले.तीर्थपुरी येथील नवीन बस बसस्थानकासमोपरील या दुकानाला आग लागली त्यावेळी वीज वितरण कंपनीचा वीजपुरवठा बंद होता. गावातील काही विजेचे काम सुरू असल्यामुळे वीज बंद होती. यामुळे शॉर्टसर्किट झालेले नाही. उलट दुकानाला आग लागल्यामुळे आगीचा भडका झाल्याने विजेच्या तारा वितळून तुटल्या आहेत. तसेच ज्या दुकानाला आग लागली त्यांच्याकडे थकबाकी असल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता. अशी माहिती वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता व्यंकटेश परशे यांनी दिली आहे. तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात विजेच्या शॉर्ट सर्किटनेच ही आग लागली आहे.

टॅग्स :fireआगMarketबाजार