शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

लाखाचे एक कोटी करून देतो म्हणत साडेपाच लाखांचा चुना; जादूटोण्याचे प्रयोग करणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:52 IST

जादूटोण्याच्या साहित्यासह एक लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त

जालना : एक लाख रुपयाचे जादूने एक कोटी रुपये करून देतो, असे आमिष दाखवीत दोघांची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्ररकणी जादूटोणा करणाऱ्यास तालुका पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याच्याकडून जादूटोण्याच्या साहित्यासह एक लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

रतन आसाराम लांडगे (रा. भक्तेश्वरनगर, जेल रोड, जालना) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पेरेजपूर (ता. साक्री, जि. धुळे.) येथील किशोर पंडित शेवाळे यांचे तीन लाख रुपये आणि त्यांचा पुतण्या दिलीप आसाराम शेवाळे यांचे अडीच लाख रुपये रतन लांडगे याने घेतले होते. एक लाखाचे एक कोटी करून देण्याचे आमिष दिले. परंतु, जादूटोण्याचे प्रयोग करीत आपली फसवणूक झाल्याचे शेवाळे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) लांडगे याच्या घराची पंचांसमक्ष झाडाझडती घेतली. त्यावेळी जादूटोण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, रोख रक्कम असा एक लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक संतोष साबळे, पोकॉ. माळी, काळे, जाधव यांच्या पथकाने केली.

मालिका निर्माताही अमिषाला बळीपोलिसांनी लांडगे याच्या घराची झाडाझडती घेतली, त्यावेळी मालिका निर्माते पद्मनाभ जयप्रकाश राणे (वय-४१), विकास वसंत अनभवने (वय-४१), नारायण गजानन जोशी (वय-५२) हे तिघे आढळून आले. हे तिघेही एक लाख रूपये घेऊन लांडगे यांच्याकडे आल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांच्या धाडीमुळे त्यांची फसवणूक टळली.

मुंजा प्रकटला अन् चांदीचा मुकूट मागितलाकिशोर शेवाळे आणि त्यांचा पुतण्या पैसे घेऊन गेल्यानंतर लांडगे याने मुंजा प्रकट करून दाखवितो, असे म्हणत त्यांना खोलीबाहेर नारळ ठेवायला सांगितले. नंतर लहान मुलाच्या सांगाड्यातून मुंजा प्रकट झाला असून, तुम्ही त्याचे दर्शन घ्या आणि त्याची इच्छा पूर्ण करा, असे सांगितले. रोहित शेवाळेने मुंजाची इच्छा विचारली असता मुंजाने चक्क पाच किलोचा चांदीचा मुकुट आणण्यास सांगितले. पैशाअभावी काका- पुतण्या लांडगे याच्या घरातून बाहेर आले. नंतर काही वेळानंतर शेवाळे यांनी पैसे नाहीत, असे म्हटले असता लांडगे याने मुकुटासाठी आग्रह धरला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे शेवाळे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली.

स्मशानभूमित आठ दिवस ठेवले लाडूलांडगे याच्या सांगण्यानुसार शेवाळे यांनी सलग आठ दिवस स्मशानभूमीत लाडू ठेवला. नंतर लांडगे याची भेट घेतली असता तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाडू ठेवला. काही दिवसानंतर शेवाळे पुतण्याला घेऊन आले. तेव्हा तुम्ही काहीतरी चुकीचे करता. पूजा पूर्ण होत नाही, असे म्हणत पुतण्या रोहितवर यांच्यावर प्रयेाग करण्यास सांगितले. त्यावेळी हातचालाखीने एक लाखाचे दोन कोटी करून दाखविले आणि नंतर रोहितकडून तीन लाख रूपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गोणीत कागदी बंडल अन् एक ५०० ची नोटपोलिसांनी लांडगे याच्या घरातून एक काळ्या रंगाचा भालूचा मास्क, प्लास्टिकची मानवी कवटी, दोन पाय, दोन हात यासह इतर साहित्य व तीन पांढऱ्या गोण्यांमध्ये नोटांच्या आकाराने कापलेल्या कोऱ्या कागदाची बंडले, एका गोणीतील १६ बंडलांवर प्रत्येकी ५०० रूपयांची लावलेली एक नोट असा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना