शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात ‘जीबीएस’चा पहिला रुग्ण; परराज्यातून आल्यानंतर तब्येत बिघडली, रिपोर्ट पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:22 IST

जीबीएसची लागण झालेली व्यक्ती खासगी कामानिमित्त १ मार्च रोजी बाहेरील राज्यात गेली होती

जालना : जिल्ह्यातील एका २३ वर्षीय व्यक्तीस गुइलेन-बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस या दुर्मीळ आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात जीबीएसचा हा पहिलाच रुग्ण आढळून आला असून, शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

जीबीएसची लागण झालेली व्यक्ती खासगी कामानिमित्त १ मार्च रोजी बाहेरील राज्यात गेली होती. तेथून परतल्यानंतर रविवारी त्यांच्या पायांमध्ये कमजोरी जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. डाॅक्टरांनी विविध तपासण्या केल्या असता रिपोर्टमध्ये जीबीएस पॉझिटिव्ह आला असल्याचे उघड झाले असल्याची माहिती खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिली. उपचार सुरू असलेला रुग्ण चांगल्या स्थितीत असून, धोक्याच्या बाहेर असल्याचेदेखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

जिल्हा रुग्णालय मात्र अनभिज्ञजिल्ह्यात जीबीएसचा रुग्ण आढळून आला असला तरी, याबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डाॅक्टर मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, हा रुग्ण एका खासगी रुग्णालयातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र, येथे आल्यानंतर त्यांच्या आजाराबद्दल वरवरच्या तपासण्या करून त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाकडे रेफर करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हात वर केले.

टॅग्स :JalanaजालनाHealthआरोग्य