शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जालन्यात पुन्हा गोळीबार; दारुड्याचा बाजारात गावठी कट्टा घेऊन गोंधळ, गोळीबारात तरुण जखमी

By दिपक ढोले  | Updated: December 21, 2023 17:41 IST

तरुणावर गोळीबार केल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीस ठेवले बांधून

जालना : दारू पिऊन आठवडी बाजारात हातात गावठी पिस्टल घेऊन गोंधळ घालणाऱ्याने समजून सांगण्यास गेलेल्या तरूणाच्या पोटात गोळी झाडल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. अमोल पांडुरंग शिंदे (३५ रा. पानेवाडी, ता. घनसावंगी) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.  

घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे गुरूवारी आठवडी बाजार असतो. दुपारी दोन वाजेच्या सुमारास संशयित कुमार शिंदे नावाचा युवक दारू पिऊन हातात गावठी पिस्टल घेऊन गोंधळ करीत होता. त्याचवेळी त्याला गावातील काही तरूण समजवून सांगण्यास गेले. त्याचवेळी त्याने अमोल शिंदे याच्या पोटात गोळी झाडाली. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने आठवडी बाजार बंद करून घनसावंगी पोलिसांना याची माहिती दिली. तर जखमीला तातडीने घनसावंगी येथील रूग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथून जालना येथे रेफर करण्यात आले. परंतु, पोटात गोळी लागल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केले आहे. 

 

ग्रामस्थांनी ठेवले बांधून सदरील तरूण हा दारू पिऊन नागरिकांना गावठी पिस्टलचा धाक दाखवून गोंधळ घालता होता. त्याने अमोल शिंदे याच्यावर गोळीही झाडली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचे हातपाय बांधून ठेवले. याची माहिती घनसावंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून गावठी पिस्टल व जीवंत काडतूसे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना