शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

११ हातगाडेधारकांना ८०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:21 IST

वाहतुकीला अडथळा करणाऱ्या हातगाडेधारकांविरूध्द शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाहतुकीला अडथळा करणाऱ्या हातगाडेधारकांविरूध्द शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे. गत दोन दिवसांत २२ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली असून, यातील ११ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने संबंधितांना न्यायालय उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी ८०० रूपयांचा दंड ठोठावला.शहर वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी शहरात दोन ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. याचबरोबर आता रस्त्यावर हातगाडे उभे करून व्यवसाय करणाऱ्यांविरूध्दही शहर वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश भाले व त्यांच्या टीमने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. प्रारंभी हातगाड्यावर व्यवसाय करणाºयांना वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची काळजी घ्यावी, रस्त्यावर हातगाडे उभे करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांचे पालन न करणा-या हातगाडेधारकांविरूध्द गत दोन दिवसांपासून कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील मामा चौक, फूलबाजार, लक्कडकोट, गांधी चमन, मस्तगडसह इतर परिसरात रस्त्यावर हातगाडे उभे करणा-या २२ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूक