शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अखेर केदारखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यावर बसले गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:58 IST

केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्ताची दखल घेत रविवारी सकाळीच संबंधित विभागाने १०० गेट उपलब्ध करून ते बसविण्यासही सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्ताची दखल घेत रविवारी सकाळीच संबंधित विभागाने १०० गेट उपलब्ध करून ते बसविण्यासही सुरूवात केली आहे.दुष्काळाच्या झळा सोसणा-या केदारखेडा परिसरात गत पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला होता. केदारखेडा गावच्या शिवारातून वाहणा-या नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र, या बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे येणारे पाणी नदीपात्रातून वाहून जात होते. केदारखेडा येथील पूर्णा नदीवर मोठा खर्च करुन तीन वर्षांपूर्वी बंधारा उभारण्यात आलेला आहे. मात्र, दोनच गेट आसल्याने नदीला आलेले पाणी वाहून जात होते. गतवर्षी नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता आणि अता आलेले पाणी डोळया देखत वाहून जात असल्याने ग्रामस्थांची घालमेल सुरु होती. या अनुषंगाने शुक्रवारी गेट कोणत्या कारणाने टाकले जात नाही यासाठी विशेष बैठक घेतली. बैठकीतील विषय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सांगितला. याच बैठकीचा व सर्वसामन्यांची तळमळ पाहून ‘लोकमत’ने रविवारी ‘पाणी आले अन् वाहून चालले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तात्काळ प्रती चारी तीन प्रमाणे १०० गेट उपलब्ध करुन दिले आहेत.हे गेट रविवारी सकाळीच टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर. के. जाधव, अंबादास सहाने, श्रीराम जाधव, डिंगाबर तांबडे, गणेश तांबडे, रावसाहेब जाधव आदींची उपस्थिती होती. बंधा-याला गेट बसविले जात असल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Lokmat Impactलोकमत इम्पॅक्टIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प